जेजुरीत वॉटरमीटरची होतेय चोरी

By Admin | Published: March 16, 2017 02:02 AM2017-03-16T02:02:12+5:302017-03-16T02:02:12+5:30

शहरातील नागरिकांच्या नळजोडांना नगरपालिकेच्या वतीने बसविण्यात आलेल्या वॉटरमीटरची चोरी होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Theft of Watermatter in Jezuri | जेजुरीत वॉटरमीटरची होतेय चोरी

जेजुरीत वॉटरमीटरची होतेय चोरी

googlenewsNext

जेजुरी : शहरातील नागरिकांच्या नळजोडांना नगरपालिकेच्या वतीने बसविण्यात आलेल्या वॉटरमीटरची चोरी होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सुमारे ३ हजार रुपयांचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागणार असल्याचे समजते.
जेजुरी नगरपालिकेच्या वतीने नागरिकांच्या नळकनेक्शनला गेल्या दोन महिन्यांपासून वॉटरमीटर बसविण्याचे काम सुरू आहे. पुढील काळात शहरवासियांना मीटरपद्धतीने पाणीपुरवठ्याचे बिल आकारले जाणार असल्याचे पालिकाप्रशासनाचे धोरण आहे. शहरामध्ये तीन हजारांच्या आसपास नळकनेक्शन असून, आतापर्यंत सुमारे २२०० वॉटरमीटर बसविण्यात आले आहेत. तसेच, वॉटरमीटर बसविण्याचे कामही सुरू आहे. यूएसए पेटेन्टेड आयट्रॉन कंपनीचे सुमारे ३५०० रुपये किंमत असलेले चांगल्या दर्जाचे वॉटरमीटर ठेकेदारामार्फत नगरपालिकेच्या खर्चाने बसविण्यात आले आहेत. त्याचा कोणताही बोजा नागरिकांवर नाही. मात्र, बसविण्यात आलेल्या वॉटरमीटरची सर्वस्वी जबाबदारी नागरिकांची आहे. वॉटरमीटर बसविण्याचे काम सुरू असतानाच मीटर चोरीला जात असल्याच्या सुमारे १० तक्रारी नगरपालिकेमध्ये दाखल झाल्या आहेत.
नळकनेक्शनला जोडण्यातआलेल्या सुमारे साडेतीन हजार रुपये किमतीच्या मीटरची चोरी होत असल्याच्या तक्रारी नगरपालिकेमध्ये दाखल झाल्याने पालिकाप्रशासनाने खेद व्यक्त केला आहे. अधिक माहिती घेतली असता असे समजते की,नळकनेक्शनला जोडण्यात आलेल्या वॉटरमीटर मध्ये पितळी धातूचे पार्ट असल्याची माहिती असणाऱ्या व्यक्तीच चोरी करीत असाव्यात.

Web Title: Theft of Watermatter in Jezuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.