‘तरुणाई’ असेल यंदाच्या ‘पिफ’ची थीम; आॅनलाईन नोंदणीला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 05:19 PM2017-12-11T17:19:28+5:302017-12-11T17:24:33+5:30

'पुणे फिल्म फाउंडेशन' आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या जाणाऱ्या 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'ची (पिफ) रसिक नोंदणी प्रकिया सुरू झाली आहे.

The theme of 'Pip' will be 'youthful'. Starting online registration | ‘तरुणाई’ असेल यंदाच्या ‘पिफ’ची थीम; आॅनलाईन नोंदणीला सुरूवात

‘तरुणाई’ असेल यंदाच्या ‘पिफ’ची थीम; आॅनलाईन नोंदणीला सुरूवात

Next
ठळक मुद्दे११ ते १८ जानेवारी, २०१८ दरम्यान होणार यंदाचा 'पिफ' महोत्सव संकेतस्थळावर जाऊन इच्छुकांना करता येणार आॅनलाईन नोंदणी

पुणे : 'पुणे फिल्म फाउंडेशन' आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या जाणाऱ्या 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'ची (पिफ) रसिक नोंदणी प्रकिया सुरू झाली आहे. यंदाचा 'पिफ' महोत्सव ११ ते १८ जानेवारी, २०१८ दरम्यान होणार असून 'तरुणाई' ही महोत्सवाची प्रमुख 'थीम' असणार आहे. 
प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आणि दरवर्षी चित्रपटप्रेमींना प्रतीक्षा असलेल्या या महोत्सवाचे हे १६वे वर्ष आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी नोंदणी प्रक्रियेची माहिती www.piffindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून आज (सोमवार, दि. ११ डिसेंबर)पासून ही नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे.
संकेतस्थळावर जाऊन इच्छुकांना आॅनलाईन नोंदणी करता येणार आहे. संकेतस्थळावर नोंदणी झाल्यानंतर मिळालेल्या नोंदणी क्रमांकासह त्यांना सिटी प्राईड-कोथरूड, सिटी प्राईड- सातारा रस्ता किंवा मंगला चित्रपटगृह यांपैकी कोठेही जाऊन 'स्पॉट रजिस्ट्रेशन' करावे लागणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही स्पॉट रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. हे 'स्पॉट रजिस्ट्रेशन' २० डिसेंबरपासून वर सांगितलेल्या ठिकाणी सकाळी ११ ते सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत करता येणार आहे.
विद्यार्थी, 'फिल्म क्लब'चे सभासद व ज्येष्ठ नागरिक (६० वर्षांपुढील) यांना ओळखपत्र दाखवून रुपये ६०० मध्ये नोंदणी करता येणार आहे, तर इतर इच्छुकांसाठी नोंदणी शुल्क रुपये ८०० इतके आहे.
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ५ ठिकाणी तब्बल १० स्क्रीन्सवर  महोत्सवातील चित्रपट रसिकांना पाहता येणार आहेत. सिटी प्राईड- कोथरूड हे महोत्सवाचे मुख्य स्थळ असून त्याबरोबरच पुण्यात सिटी प्राईड-सातारा रस्ता, मंगला मल्टीप्लेक्स, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) या चित्रपटगृहांमध्ये चित्रपट दाखवले जाणार आहेत.

Web Title: The theme of 'Pip' will be 'youthful'. Starting online registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.