...तर धरणाचा वॉल तोडून पाणी सोडू

By admin | Published: March 31, 2017 02:42 AM2017-03-31T02:42:49+5:302017-03-31T02:42:49+5:30

खेड तालुक्यातील चासकमान धरणातील पाणी तालुक्यातील जनतेच्या हक्काचे आहे. ते तालुक्यातील जनतेला

... then break the wall of dam and leave it water | ...तर धरणाचा वॉल तोडून पाणी सोडू

...तर धरणाचा वॉल तोडून पाणी सोडू

Next

दावडी : खेड तालुक्यातील चासकमान धरणातील पाणी तालुक्यातील जनतेच्या हक्काचे आहे. ते तालुक्यातील जनतेला टंचाईच्या काळात मिळालेच पाहिजे. जर दोन दिवसांत पाणी सोडण्याचा निर्णय झाला नाही तर चासकमान धरणावर हजारो शेतकऱ्यांना नेऊन हाताने वॉल उघडून पाणी सोडले जाईल, असा इशारा माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिला आहे.
खेड तालुक्याच्या पूर्व भागातील टाकळकरवाडी, भांबुरवाडी, जऊळके, खरपुडी, निमगाव, दावडी, दौंडकरवाडी, शेलपिंपळगाव या परिसरातुन पुढे शिरुर तालुक्यात जातो. पूर्व भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असूनही चासकमान धरणातून पाणी सोडले जात नाही. त्या पार्श्वभूमीवर आज थेट राजगुरुनगर येथील चासकमान प्रकल्प विभाग ५च्या पाटबंधारे उपअभियांता यांच्या कार्यालयावर थेट मोर्चा काढण्यात आला. या वेळी येथे अधिकारीवर्ग उपस्थित नसल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांच्या भावनांची कदर करा अन्यथा त्यांच्या रोषाला सामोरे जा असे आक्रमक होत नाराजी व्यक्त केली.
माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली खेड तालुक्यातील पूर्व भागातील चिंचोशी, शेलपिंपळगाव, कोयाळी, काळूस, दावडी निमगाव, खरपुडी, होलेवाडी आदी गावातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी ए. ए. कपोले यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांची बाजू मांडली. या वेळी त्यांनी दोन दिवसांत पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. पालकमंत्री बापट यांच्याशी चर्चा करून तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी सोडण्याबाबत चर्चा केली जाईल, असे आश्वासन दिले. दोन दिवसांत निणर्य झाला नाही तर पाण्यासाठी तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला.
दिलीप मोहिते पाटील म्हणाले, पाण्याअभावी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिके जळू लागली आहेत. अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत. दोन दिवसांत यावर निर्णय झालाच पाहिजे. तसे न झाल्यास शेतकरी अधिकारीवर्गाला सोडणार नाहीत अशी शेतकऱ्यांनी भूमिका घेतली आहे. सरकार आणि अधिकारीवर्ग खेड तालुक्यातील शेकऱ्यांबाबत दुजाभाव करीत आहे. खेड तालुक्यातील जिथपर्यंत कालवा आहे तिथपर्यंत पाणी सोडलेच पाहिजे. या वेळी जिल्हा परिषद सदस्या निर्मला पानसरे, वैशाली गव्हाणे, कैलास सांडभोर, संतोष गव्हाणे, शिवाजी दरगुडे, भानुदास अमराळे, शंकर माळी, विजय गंगावणे, तुषार निकम, देवराम सातपुते, दत्ता ओंबाळे, शिवाजी दरगुडे, सीताराम गुजर, दत्ता लांडे आदी उपस्थित होते.

‘पाणी आमच्या हक्काचे आहे ते आम्हाला मिळालेच पाहिजे’ अशा घोषणा देत आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी झालेले माजी सैनिक व प्रगतिशील शेतकरी बाजीराव दौंडकर यांनी धरणातून पाणी सोडले नाही तर अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर गळफास घेऊन आत्महत्या करणार, असा इशारा दिला आहे.

Web Title: ... then break the wall of dam and leave it water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.