...तर तुझ्या पप्पांना मारुन टाकेल' अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत मारहाण, सर्पमित्रावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 03:31 PM2023-01-22T15:31:37+5:302023-01-22T15:31:47+5:30
आरोपीची एका कनिष्ठ महाविद्यालयातील १७ वर्षीय मुलीबरोबर स्नॅपचॅटवर ओळख झाली होती
धनकवडी : स्नॅपचॅटवर ओळख, नंतर पाठलाग, नंतर भेट घेण्याचा प्रयत्न, अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत मारहाण आणि घरच्यांना सांगित ला तर पप्पांना मारुन टाकेल अशी धमकी देणाऱ्या एका सर्पमित्रावर पॉस्को अंतर्गत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. निलेश कांबळे (वय २४ वर्षे, राहणार उंब्रज, ता. कराड, जि.सातारा) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी कांबळेची एका कनिष्ठ महाविद्यालयातील १७ वर्षीय मुलीबरोबर स्नॅपचॅटवर ओळख झाली होती. त्यानंतर त्याने तीची पुण्यात भेट घेऊन जबर दस्तीने तीचा विनयभंग केला. हा प्रकार घरच्यांना सांगित ला तर पप्पांना मारुन टाकेल अशी धमकी दिली. यानंतर वारंवार तीचा महाविद्यालयापासून रहात्या घरापर्यंत पाठलाग केला. ती फोन उचलत नसल्याच्या कारणावरुन तीला शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश ढमे करत आहेत.