...तरचं रुग्णांना सुरू करा अँटीव्हायरल औषधे" देशभरात व्हायरल फिव्हरने नागरिक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 01:06 PM2023-03-21T13:06:55+5:302023-03-21T13:07:11+5:30

१०२ डिग्रीपेक्षा जास्त ताप, घसा दुखी, नाक गळत असल्यास उपचार अनिवार्य; केंद्रीय आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी

Then start antiviral drugs to the patients Citizens are suffering from viral fever across the country | ...तरचं रुग्णांना सुरू करा अँटीव्हायरल औषधे" देशभरात व्हायरल फिव्हरने नागरिक त्रस्त

...तरचं रुग्णांना सुरू करा अँटीव्हायरल औषधे" देशभरात व्हायरल फिव्हरने नागरिक त्रस्त

googlenewsNext

पुणे: ‘रुग्णांना जर १०२ डिग्रीपेक्षा जास्त ताप असेल (हायग्रेड फिव्हर), घसादुखी, नाक गळत असेल. साेबत खाेकला, अंगदुखी, डाेकेदुखी, डायरिया व उलट्या अशी लक्षणे दिसत असतील तर त्यांना तातडीने ‘ऑसेल्टेमिव्हिर’ ही अँटीव्हायरल औषधे सुरू करावीत,’ अशा सूचना केंद्रीय आराेग्य विभागाने प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स यांना निर्गमित केल्या आहेत. सध्याच्या व्हायरल फिव्हरचे वाढत्या रुग्णांची संख्या पाहता या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

केंद्रीय आराेग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये म्हटले आहे की, सध्या देशभरात इन्फ्ल्युएन्झा ए, बी, सीच्या विषाणूंची संख्या वाढलेली आहे. साेबतच ‘इन्फ्ल्युएन्झा ए’चा उपप्रकार असलेल्या ‘एच ३ एन २’ याचेही रुग्ण वाढलेले आहेत. याचबराेबर सारी, एच १ एन १, इन्फ्ल्युएन्झा ए लाईक इलनेस, ॲडेनाेव्हायरस या विषाणूंचाही प्रादुर्भाव झालेला प्रयाेगशाळांच्या तपासणीतून पुढे येत आहे. त्याला प्रामुख्याने पाच वर्षांच्या आतील मुले, वयाेवृद्ध यांच्यामध्ये प्रसार हाेत आहे.

अशावेळी त्यांचे वेळीच निदान करून त्यांना अँटीबायाेटिक न देता अँटीव्हायरल औषधे सुरू केल्यास त्यांची तब्येत सुधारण्यास मदत हाेते, असे आधीच सांगितलेले आहे. म्हणून हे उपचारांच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. हीच मार्गदर्शक तत्त्वे पुढे राज्यांना व राज्याच्या आराेग्य खात्याने पुढे सर्व सरकारी व खासगी डाॅक्टरांना, संस्थांना निर्गमित केल्या आहेत.

असे आहेत उपचारांचे प्राेटाेकाॅल

- साधा ताप, खाेकला, घसादुखी यासाठी स्वॅब घेणे गरजेचे नाही. ऑसेल्टेमिव्हिरसारखी अँटीव्हायरल औषधांचा वापर करण्याची गरजही नाही. अंगदुखी, डाेकेदुखी, डायरिया आणि मळमळ यांच्यावर लक्षणानुसार उपचार करण्याची गरज असून, रुग्ण निरीक्षणाखाली ठेवणे आवश्यक आहे.
- अंगदुखी, डाेकेदुखी, डायरिया, नाक गळणे आणि मळमळ यांसह १०२ पेक्षा अधिक ताप असेल तर ताे हायरिस्क पेशंट समजून उपचार करणे आवश्यक आहे. अशा रुग्णांचा स्वॅब घेण्यासह ऑसेल्टेमिव्हिर अँटीव्हायरल औषधांचा डाेस सुरू करावा.
- अंगदुखी, डाेकेदुखी, डायरिया, नाक गळणे, मळमळ यांसह १०२ पेक्षा अधिक ताप असेल, श्वास घेण्यास त्रास, छातीत दुखणे, उच्च रक्तदाब, नखे निळी पडणे, मुलांमध्ये गुंगी आणि चिडचिड अशी लक्षणे आढळत असतील तर अशा रुग्णांचा स्वॅब तपासणे आवश्यक आहे. तसेच त्यांना रुग्णालयात ॲडमिट करून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात यावेत.

Web Title: Then start antiviral drugs to the patients Citizens are suffering from viral fever across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.