...तर पुरोगामी महाराष्ट्राचे राजकारण गढुळ होण्याची भीती" - आमदार रोहित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 08:54 PM2022-11-07T20:54:54+5:302022-11-07T20:55:01+5:30
भविष्यात कोणाच्याही विरोधात चुकीची वक्तव्य होऊ नयेत. निषेध मोर्चात मोठ्या ताकतीने विरोध करु
बारामती : नेते खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य करीत असल्यास शांत बसुन चालणार नाही. याबाबत कुठे ना कुठे निषेध करावाच लागेल. हिच प्रथा पुढे पडली तर ,पुरोगामी महाराष्ट्राला एक परंपरा आहे.मोठ्या राज्यात अशा पध्दतीने नेते खालच्या पातळीवर वक्तव्य करीत राहिल्यास राजकारण आणि विचारसरणी कुठेतरी गढुळ होण्याची भीती आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली.
यावेळी बारामती येथे बोलताना आमदार पवार पुढे म्हणाले, राजकारण गढुळ होत राहिल्यास पुढील पिढीला अडचण निर्माण होऊ शकते. या गोष्टी होऊ नयेत, त्यामुळे कोणाच्या विरोधात वक्तव्य झाल्यास निषेध महाराष्ट्र म्हणुन केला पाहिजे. भविष्यात कोणाच्याही विरोधात चुकीची वक्तव्य होऊ नयेत. निषेध मोर्चात मोठ्या ताकतीने विरोध करु, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारी संपत्तीला कुठेही नुकसान पोहचवु नका, असे आवाहन पवार यांनी केले.
पवार पुढे म्हणाले, खालच्या पातळीवर बोलायच, आमच्या नेत्यांवर बोलायच. अशा पध्दतीने सर्वच बोलत आहेत. अजुन मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे पद मिळण्याच्या आशेने हे सर्व चालले आहे. सर्वांची शर्यत लागलेली आहे. कोण पवारांच्या विरोधात बोलतो, कोण विरोधकांच्या विरोधात बोलतो. लोकांच्या हितासाठी कोणी बोलत नाहीत, हे सर्वांच्याच लक्षात आले असल्याचे पवार म्हणाले.