...तर त्यांची मुले दिव्यांग जन्माला येतील; वक्तव्य करणारे कीर्तनकार इंदुरीकर अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 06:39 PM2022-05-10T18:39:11+5:302022-05-10T18:39:27+5:30

दिव्यांग कल्याण आयुक्तांचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश

then their children will be born crippled Kirtankar Indurikar who made the statement is in trouble | ...तर त्यांची मुले दिव्यांग जन्माला येतील; वक्तव्य करणारे कीर्तनकार इंदुरीकर अडचणीत

...तर त्यांची मुले दिव्यांग जन्माला येतील; वक्तव्य करणारे कीर्तनकार इंदुरीकर अडचणीत

googlenewsNext

पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्याने अडचणीत आले आहेत. पुण्यातील दोन जणांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत दिव्यांग कल्याण आयुक्तांनी तक्रारीची चौकशी करून दोषी आढळल्यास कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, असे आदेश अकोला पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

याविषयी राजेंद्र वाकचौरे व दत्तात्रय भोसले यांनी तक्रार केली आहे. अकोला येथे झालेल्या कीर्तनात इंदुरीकर यांनी माझ्या कीर्तनाचे व्हिडिओ वाहिनीवर टाकणाऱ्यांची मुले दिव्यांग जन्माला येतील, असे म्हटल्याचे वाकचौरे व भोसले यांचे म्हणणे आहे. तसे निवेदन व तक्रार त्यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे दिले. इंदुरीकर यांच्या वक्तव्यामुळे दिव्यांग व्यक्तींच्या भावना दुखावल्या. दिव्यांग व्यक्ती हक्क कायद्यानुसार हा गुन्हा आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी वाकचौरे व भोसले यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे केली आहे.

दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी त्याची दखल घेतली. त्यानुसार त्यांनी अकोले पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी तक्रारीची प्रत जोडून याची चौकशी करावी, अशी सूचना पोलीस अधीक्षकांना केली आहे. आसपास विचारणा करावी. दोषी आढळल्यास दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६मधील कलम ९२ (अ) नुसार त्वरित गुन्हा दाखल करण्याची कारवाई करावी, असा आदेशही त्यात देशमुख यांनी दिला आहे.

Web Title: then their children will be born crippled Kirtankar Indurikar who made the statement is in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.