...तर राज्यात मध्यावधी निवडणुका होणार, चंद्रकांत पाटलांचे भाकीत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 03:09 PM2020-02-05T15:09:17+5:302020-02-05T15:14:09+5:30
'कोणी कोणाचा विश्वासघात केला. हे जनता ठरवेल'
पुणे : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन 100 दिवस उलटणे बाकी असताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र राज्यात मध्यावधी निवडणुकांचे भाकीत केले आहे. राज्यात नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये निवडणुका झाल्यास कोणी कोणाचा विश्वासघात केला, हे स्पष्ट होईल अशा भाषेत चंद्रकांत पाटील यांनी आपला अंदाज व्यक्त केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत 'भाजपाने विश्वासघात केल्याचे' म्हटले होते.त्यावर आता चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत उत्तर दिले. 'कोणी कोणाचा विश्वासघात केला. हे जनता ठरवेल' असेही त्यांनी सांगितले. मात्र, याचवेळी त्यांनी मध्यावधी निवडणुकांचीही शक्यता वर्तवली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, 'लोकांना माहिती आहे कोणी कोणाचा विश्वास घात केला. ज्यांना वाटत असेल हे सरकार जास्त काळ चालेल तर असे काही होणार नाही. त्यामुळे ठाकरे असे बोलत असतील तर नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान मध्यावधी निवडणुका झाल्या तर कोणी कोणाचा विश्वासघात केला हे लोक ठरवतील."
(चंद्रकांतदादांची जीभ घसरली; 'काँग्रेसने हळूहळू शर्ट काढला, पॅन्ट काढली आणि आता...')
दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार जेमतेम कामाला सुरुवात करत असताना चंद्रकांत पाटील यांच्या अंदाजाने मात्र राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे. आता यावर काँग्रेस, शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस काय उत्तर देणार याकडेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितला राम मंदिराच्या बांधणीचा प्लॅन, लोकसभेत केली मोठी घोषणा
राम मंदिरासाठी ट्रस्टची घोषणा करताच उद्धव ठाकरेंनी केले मोदींचे अभिनंदन
नरेंद्र मोदींच्या 'त्या' निर्णयासाठी राज ठाकरेंकडून अभिनंदन, व्यक्त केली अपेक्षा!
जवानांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढणार, CDS बिपीन रावतांचे संकेत