...तर ओबीसी आरक्षणासाठी गावागावांत संघर्ष उभा राहील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:10 AM2021-07-31T04:10:10+5:302021-07-31T04:10:10+5:30

बारामती : राज्य सरकारने डिसेंबरपूर्वी ओबीसींच्या आरक्षणाचा इम्पेरिकल डाटा न्यायालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. डिसेंबरपर्यंत डेटा तयार करा. भारतीय ...

... then there will be a struggle in villages for OBC reservation | ...तर ओबीसी आरक्षणासाठी गावागावांत संघर्ष उभा राहील

...तर ओबीसी आरक्षणासाठी गावागावांत संघर्ष उभा राहील

Next

बारामती : राज्य सरकारने डिसेंबरपूर्वी ओबीसींच्या आरक्षणाचा इम्पेरिकल डाटा न्यायालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. डिसेंबरपर्यंत डेटा तयार करा. भारतीय जनता पक्ष सरकारचे जाहीरपणे अभिनंदन करेल. मात्र, या कालावधीत डेटा तयार न केल्यास त्याचा अर्थ सरकारच्या मनात काहीतरी काळेबेरे आहे असा होईल. ओबीसी आरक्षण न देता धनदांडग्यांना ओबीसींच्या जागांवर उभं करायचे, असे सरकारचे षडयंत्र आहे, असे आम्हाला वाटेल. त्यानंतर गावागावांत, रस्त्यांवर संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी दिला.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे ओबीसी आरक्षण कृती समितीच्यावतीने प्रशासकीय भवनासमोर एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. त्यामुळे मोर्चा न होता फक्त सभा घेऊन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन देण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी ऊर्जामंत्री बावनकुळे उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले, बारामतीतून ओबीसींचा एल्गार पुकारला गेला आहे. तो महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचेल. राजकारण न करता आम्ही भाजप नेते सरकारच्या मदतीला तयार आहोत. सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे ओबीसींचा डेटा तयार करावा. वेळेत डोटा न्यायालयाकडे सादर करणे आवश्यक आहे, तरच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना राजकीय आरक्षणाचा लाभ मिळेल. मात्र, डाटा सादर न झाल्यास होणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसींचे मोठे नुकसान होणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर म्हणाले, एकी नाही हेच राजकारण्यांचे भांडवल आहे. ओबीसींचा अभ्यास नसणारे लोक पंतप्रधानांना भेटायला गेले. जोपर्यंत नेता जन्मणार नाही, तोपर्यंत तुम्ही घडणार नाही. याबद्दल आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. ओबीसींचे आमदार, खासदार बनवा, पक्ष तुम्ही ठरवा. रिमोट कंट्रोल हातात देऊ नका, असे जानकर म्हणाले.

या वेळी टी. जी. मुंडे, जी. बी. गावडे, अविनाश मोटे, ज्ञानेश्वर कौले, बापूराव सोलनकर, मच्छिंद्र टिंगरे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी माजी आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे, टी. जी. मुंडे, अविनाश मोटे, अ‍ॅड जी. बी. गावडे, मोहनराव मदने, ज्ञानेश्वर कौले, संदीप चोपडे, सतीश फाळके, पांडुरंग कचरे, डॉ. अर्चना पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक बापूराव सोलनकर यांनी केले. सूत्रसंचालन कुमार देवकाते यांनी, तर आभार सुनील ढोले यांनी मानले.

बारामती येथे ओबीसी आरक्षण कृती समितीच्यावतीने प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन देण्यात आले.

२९०७२०२१ बारामती-१६

Web Title: ... then there will be a struggle in villages for OBC reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.