...तर व्हॉटस् अॅप ग्रुप अॅडमिनवर होणार गुन्हे दाखल; कोरेगाव भीमा मानवंदना कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 03:14 PM2020-12-30T15:14:59+5:302020-12-30T15:50:20+5:30
ग्रुप अॅडमिनला अटक व आरोपींना तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते..
कोरेगाव भीमा : व्हॉटस् अॅप ग्रुपवर १ जानेवारी मानवंदना कार्यक्रमाच्या अनुषंगाने समाज विघातक पोस्ट , मजकुर , व्हिडिओ , आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आल्यास व त्यातुन कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ग्रुप अॅडमिनवर सर्वस्वी जबाबदार धरुन प्रचलित नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असुन याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १२० ग्रुप अॅडमिन व लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ४१० ग्रुप अॅडमिनला त्यासंधर्भात तशा लेखी नोटिसा पोलिसांकडून देण्यात आल्या असल्याने यापुढिल काळात ग्रुप अॅडमिनला ग्रुपवर बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे.
१ जानेवारी २०१८ च्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार परिसरात न घडु देण्यासाठी गतवर्षीपासुन जिल्हाप्रशासन व पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणावर कार्यरत झाले असुन छोट्या छोट्या गोष्टींवरही जिल्हा पोलीस प्रशासनाचे बारकाईने अभ्यास केला आहे. दंगलीच्यानंतर व्हाटस्अॅप ग्रुप , फेसबुक , सारख्या अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातुन समाजकंटक आक्षेपार्ह पोस्ट व्हिडीओ पसरवित असतात. त्यातुन सामाजीक स्वास्थ्य बिघडले जाते. यासाठी जिल्हा प्रशासनाने १ जानेवारी २०२१ च्या मानवंदना कार्यक्रमाच्या अनुषंगाने शिक्रापुर पोलीस ठाण्यातील १२० व लोणीकंद पोलीस ठाण्यातील ४१० ग्रुप अॅडमिनला या संधर्भात नोटिसा बजाविण्यात आल्या असुन व्हॉटस् अॅप ग्रुपवर समाज विघातक पोस्ट , मजकुर , व्हिडिओ , आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आल्यास व त्यातुन कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ग्रुप अॅडमिनवर सर्वस्वी जबाबदार धरुन प्रचळीत नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असुनया नोटिसा गुन्हा शाबितीकरणासाठी न्यायालयात पुरावा म्हणून वापरण्यात येणार आहेत. यात ग्रुप अॅडमिनवरच गुन्हा दाखल होऊन या गुन्ह्यात तीन वर्ष शिक्षाही भोगावी लागणार असल्याने ग्रुप अॅडमिनला येत्या काळात आपल्या ग्रुपवर लक्ष देण्याची गरज असल्याचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी सांगितले.
ग्रुप अॅडमिन सावधान गुन्हा दाखल होईल
परिसरातील व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिन व ग्रूपमधील सभासदांनी ग्रुपवर समाजविघातक , व आक्षेपार्ह मजकुर व्हिडीओ पोस्ट केल्यास किंवा कॉपी करुन इतर ठिकाणी सोशल मिडीयावर प्रसारीत केल्यास व त्यातुन कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ग्रुप अॅडमिनला अटक करून कारवाई करण्यात येणार असल्याने आरोपींना कमाल तीन वर्ष शिक्षा होऊ शकते. त्यामुळे ग्रुप अॅडमिनने सावधान राहण्याच्या सुचना पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी सांगितले