अनेकांतवाद सिद्धांत महत्त्वाचा : आचार्य देवनंदीजी; पुणे शहरात भाविकांकडून जल्लोषात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:00 PM2017-11-25T12:00:46+5:302017-11-25T12:05:28+5:30
दिगंबर जैन पंथाचे आचार्य श्री देवनंदीजीमहाराज यांचा नाशिक ‘श्रमणबेळगाव विहार’ सुरू आहे. या विहारादरम्यान त्यांचे पुणे शहरात आगमन झाले असून, अनेक भागांत त्यांचे स्वागत होत आहे.
बिबवेवाडी : दिगंबर जैन पंथाचे आचार्य श्री देवनंदीजीमहाराज यांचा नाशिक ‘श्रमणबेळगाव विहार’ सुरू आहे. या विहारादरम्यान त्यांचे पुणे शहरात आगमन झाले असून, अनेक भागांत त्यांचे स्वागत होत आहे.
निगडी, पिंपरी-चिंचवड, रविवार पेठ, सोमवार पेठ, विविध जैन मंदिरे या ठिकाणी जाऊन त्यांनी आपल्या भक्तांना आशीर्वाद दिला. तसेच मार्गदर्शन केले. मुकुंदनगर येथे प. पू. महाराजांचे भक्त जी.एस.टी.चे सहआयुक्त सुमेरकुमार काले व दिगंबर जैन समाज पुणेच्या पदाधिकारी सुवर्णा काले यांच्या निवासस्थानी त्यांचे स्वागत केले. नगरसेवक प्रवीण चोरबेले, बालब्रह्मचारी वैशालीदीदी, नीलम अजमेरा, अनिल भन्साळी, देवेंद्र बाकलीवाल, कीर्ती अजमेर, अनिल चोरडिया, जितेंद्र बोरा, प्रशांत जैन, ललित पाटणी, पंकज बडजात्या, राजेंद्र ललवाणी, कमल कासलीवाल, रोहित कासलीवाल, प्रीतम शहा आदी उपस्थित होते.
भगवान महावीरांनी सांगितलेला अनेकांतवादाचा सिद्धांत देशहितासाठी महत्त्वाचा आहे. देशातील युवाशक्तीने सध्याच्या विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी करावा. अहिंसेचा मार्ग सर्वोत्तम मार्ग आहे. युवा पिढीने या मार्गावर चालले तर आपला देश स्वर्ग होईल. आपल्या देशाची जुनी संस्कृती, साधू-संतांचे विचार जगाच्या कल्याणासाठी आवश्यक आहेत. आपला देश या संस्कृतीमधून जगाचे कल्याण करू शकतो.
- आचार्य श्री देवनंदीजी