एक लढाई अशीही ; अग्निशमन दलाच्या जवानांचे अथक प्रयत्न आणि..... 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 05:20 PM2019-10-10T17:20:03+5:302019-10-10T17:24:33+5:30

बसवर पडलेल्या झाङाने एका पीएमपीएमएल कर्मचाऱ्याचा अंतही झाला. पण त्याच रात्री एका तरुणाला प्रयत्नांची शर्थ करून जवानांनी वाचवले. अंगावर काटा उभा रहावा अशी ही घटना आहे. 

There is also a battle; Tireless efforts of fire brigade personnel and save his life Pune rain | एक लढाई अशीही ; अग्निशमन दलाच्या जवानांचे अथक प्रयत्न आणि..... 

एक लढाई अशीही ; अग्निशमन दलाच्या जवानांचे अथक प्रयत्न आणि..... 

googlenewsNext

पुणे : मुसळधार पावसाने पुणे अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात बुधवार आणि गुरुवारी दुपारपर्यंत सत्तरपेक्षा अधिक झाङपङीच्या घटनांची नोंद झाली. यामध्ये बसवर पडलेल्या झाङाने एका पीएमपीएमएल कर्मचाऱ्याचा अंतही झाला. पण त्याच रात्री एका तरुणाला प्रयत्नांची शर्थ करून जवानांनी वाचवले. अंगावर काटा उभा रहावा अशी ही घटना आहे. 



 बुधवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला. पावसाचा जोर इतका होता की मोठमोठाले वृक्षही त्यासमोर टीकाव धरू शकले नाहीत. त्यातच रात्री गंज पेठ येथील नाल्यात सनी लुंकङे नावाचा इसम तोल जाऊन खाली नाल्यात घसरल्याची वर्दी अग्निशमन दलाला मिळाली. त्यात वरून पाऊस मुसळधार सुरू असल्याने पाण्याचा प्रवाह वाढतच होता.  जागा निसरडी असल्याने तिथे उभे राहणेही कठीण होते, अडकलेला तरुण आणि त्याच्या घरच्यांचा आक्रोश सुरु होता. अशा परिस्थितीत डोके शांत ठेवत जवान चंद्रकांत आनंदास यांनी तातडीने दोरीचे लुप तयार केले. ते काय करणार असा प्रश्न जमलेल्या लोकांच्या मनात होता. मात्र त्यांनी अडकलेल्या तरुणाच्या दिशेने दोरी टाकली आणि  संबंधित तरुणाच्या खांद्याकङून काखेत अङकावून त्याला  हळूवारपणे नाल्यातून सुखरुप बाहेर काढले. 

त्यांच्या या कामगिरीने तरुणाचे प्राण वाचले आणि मोठी हानी होण्यापासून टळली. या कामगिरीमधे अग्निशमन दलाचे सहाय्यक विभागीय अधिकारी रमेश गांगङ, चालक गणेश केदारी व जवान चंद्रकांत आनंदास, राजेश कांबळे, श्रावण चव्हाण यांनी सहभाग घेतला.

Web Title: There is also a battle; Tireless efforts of fire brigade personnel and save his life Pune rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.