टेस्टिंगच्या सक्तीमुळे टेस्ट किटचाही तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:11 AM2021-04-10T04:11:48+5:302021-04-10T04:11:48+5:30

पुणे : लोकांच्या कायम संपर्कात येण्यांसाठी दर १५ दिवसांनी चाचणी करणे प्रशासनाने बंधनकारक केले आहे. त्यामुळे कोरोना चाचणीसाठी येणाऱ्यांची ...

There is also a shortage of test kits due to the compulsion of testing | टेस्टिंगच्या सक्तीमुळे टेस्ट किटचाही तुटवडा

टेस्टिंगच्या सक्तीमुळे टेस्ट किटचाही तुटवडा

Next

पुणे : लोकांच्या कायम संपर्कात येण्यांसाठी दर १५ दिवसांनी चाचणी करणे प्रशासनाने बंधनकारक केले आहे. त्यामुळे कोरोना चाचणीसाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या तुलनेत टेस्टिंग

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आता लोकांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांचे दर १५ दिवसांना टेस्टिंग करण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे. मात्र याचा परिणाम म्हणजे नागरिकांकडून टेस्टिंग सेंटरवर ‘निगेटिव्ह’ रिपोर्ट मिळवण्यासाठी गर्दी केली जात आहे. कुठे कामासाठी तर कुठे बाहेरगावी प्रवास करण्यासाठी चाचणी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे केंद्रांवरील ताण वाढून टेस्टिंगला २ ते ३ दिवसांचा वेळ लागत आहे. आता सरकारने नवा आदेश काढत आरटीपीसीआर ऐवजी ॲंटिजेन चाचण्या केलेल्याही चालतील असं सांगितले आहे. मात्र यामुळे लक्षण असणाऱ्या लोकांना चाचणीला प्राधान्य मिळत नाही.

मनोज पोचट म्हणाले “ पुण्यातल्या अनेक लॅबकडे टेस्ट किट संपले आहेत. ज्यांच्याकडे शिल्लक आहेत ते रिपोर्ट द्यायला ३-४ दिवस लावत आहेत.’’

मराठा चेंबर्स फॅार कॅामर्स ॲण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सुधीर मेहता म्हणाले, “या रिपोर्टमुळे लोकांना आपण सुरक्षित आहोत असे वाटुन त्यांच्यामध्ये निष्काळजीपणा वाढू शकतो. तसेच ॲण्टिजेन चाचणीत निगेटिव्ह येण्याची शक्यता ५० टक्के असते. या सगळ्याचा परिणाम म्हणून गरजु लोक वंचित रहात आहेत. त्यामुळे हे धोरण बदलावे अशी आमची भूमिका आहे.”

दरम्यान या गोंधळाला नेमकं काय कारणीभूत आहे हे स्पष्ट करताना सबर्बन लॅबचे अभिषेक शिवणकर म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून अनेक जण चाचणी करुन घ्यायला येत आहेत. त्यातच आता या चाचण्या स्वस्त झाल्याने सहजपणे लोक चाचणी करुन घेत आहेत. याचाच परिणाम म्हणजे अहवालाला वेळ लागत आहे.”

Web Title: There is also a shortage of test kits due to the compulsion of testing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.