देशात अराजकता माजवायची आहे का?

By admin | Published: December 23, 2016 12:57 AM2016-12-23T00:57:29+5:302016-12-23T00:57:29+5:30

नोटबंदी मुळे सर्वसामान्य माणसाचे हाल होत आहे. मोदी सरकार आर्थिक स्वातंत्र्य हिसकून घेत आहे. हे संविधानाच्या विरोधात आहे.

Is there anarchy in the country? | देशात अराजकता माजवायची आहे का?

देशात अराजकता माजवायची आहे का?

Next

पुणे : नोटबंदी मुळे सर्वसामान्य माणसाचे हाल होत आहे. मोदी सरकार आर्थिक स्वातंत्र्य हिसकून घेत आहे. हे संविधानाच्या विरोधात आहे. सर्वसामान्य माणसाचे आर्थिक शोषण करून देशात अराजकता माजवायची आहे का? असा सवाल माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी केला.
‘देश बचाव आघाडी’ तर्फे नोटाबंदीवर जाहीर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. माजी न्यायमुर्ती बी.जी. कोळसे पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष वारे, वित्त सचिव आणि नियोजन आयोगाचे माजी सदस्य एस.पी.शुक्ला आदी उपस्थित होते.
न्या. सावंत म्हणाले, ‘‘ आर्थिक आणीबाणी लादून सरकार सर्वसामान्य माणसाची गळचेपी करत आहे. उद्योगपतींची कर्जे माफ होतात मात्र शेतकऱ्यांची कर्जे माफ होत नाहीत.
काळ्या पैशांसंदर्भात घोषणा करण्या अगोदर मोदी सरकार मॉरीशस सोबत तीन वर्षांचा करार करता. मॉरीशस जगातले सर्वात मोठे काळ्या पैश्याचे घर आहे हे माहिती नाही का ? काळ्या पैशाविरुध्द लढाईचे सरकार ढोंग का करत आहे. असा सवाल कोळसे पाटील यांनी केला.
देशातील लोक म्हणजे प्रयोग शाळेतील उंदीर नाहीत, अशी टीका शुक्ला यांनी केली. नोटबंदीचा कार्यक्रम हा सिक्रेट नव्हता. नोटबंदीची घोषणा करण्या अगोदर मोदी सरकारने चार लाख कोटी रुपये छापले असल्याचा आरोप ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी केला. (प्रतिनिधी)

Web Title: Is there anarchy in the country?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.