शहरामध्ये १४५ केंद्रे संवेदनशील
By admin | Published: February 21, 2017 03:37 AM2017-02-21T03:37:24+5:302017-02-21T03:37:24+5:30
महापालिका निवडणुकीसाठीच्या साडेतीन हजार मतदान केंद्रांपैकी १४५ मतदान केंद्रे ही संवेदनशील म्हणून जाहीर
पुणे : महापालिका निवडणुकीसाठीच्या साडेतीन हजार मतदान केंद्रांपैकी १४५ मतदान केंद्रे ही संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. यापैकी सर्वाधिक संवेदनशील ५७ मतदान केंद्रे ही प्रभाग क्रमांक ९ मधील बालेवाडी व पाषाण भागांमध्ये आहेत. सहकारनगर येथे केवळ एकच मतदान केंद्र संवेदनशील जाहीर करण्यात आले आहे.
महापालिका निवडणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल, तसेच यापूर्वी वादाचे, हाणामारीचे प्रसंग घडलेल्या मतदान केंद्रांना संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात येते. या मतदान केंद्रांना विशेष पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येतो.
औंध गावठाण, पाषाण, सोमेश्वरवाडी, बावधन, सुतारवाडी, हडपसरमधील गोसावी वस्ती, वैदुवाडी, सय्यदनगर, रामटेकडी, सय्यदनगर, मंगळवार पेठ, जुना बाजार, कासेवाडी, भवानी पेठ, महात्मा फुले पेठ, खिलारे रोड, केळेवाडी, कात्रज गावठाण, जनता वसाहत पर्वती, तळजाई वसाहत, पर्वती, शास्त्रीनगर, भारती विद्यापीठ परिसर आदी ठिकाणची मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. इतर मतदान केंद्रांपेक्षा या भागाला जास्तीचा बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे.
४प्रभाग ४ मध्ये ३, १६ मध्ये, १७ मध्ये ३, १८ मध्ये ३, १९ मध्ये ४, १३ मध्ये ८, ७ मध्ये १७, ८ मध्ये १०, ९ मध्ये ५७, २४ मध्ये ६, प्रभाग ३५ मध्ये १, प्रभाग १० मध्ये १७ अशी एकूण ४५ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.