आयुष्यात संकटं येतात त्यांना तोंड देऊन पुढं जायचं; शरद पवारांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 12:30 PM2023-11-11T12:30:29+5:302023-11-11T12:32:42+5:30
खासदार शरद पवार यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
पुणे- खासदार शरद पवार कुटुंबासह दिवाळी निमित्त बारामती येथे प्रत्येक वर्षी असतात. यावर्षीही पवार कुटुंब बारामतीत दिवाळी साजरी करणार आहे. यापूर्वी काल पुण्यात सहकुटुंब एकत्र भेटले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. दरम्यान, आज शरद पवार यांनी जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.'आयुष्यात कधी कधी संकटं येतात त्यांना तोंड देऊन पुढं जायचं असतं', असं शरद पवारांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
शांततेत आंदोलन करा, नेत्यांच्या फराळाच्या कार्यक्रमाला जाऊ नका; जरांगे पाटलांचे मराठा समाजाला आवाहन
खासदार शरद पवार म्हणाले, सर्वांना दिवाळीचा सण आनंदाचा जावो. आयुष्यात चढ-उतार असतात, अडचणी असतात त्यांना तोंड देऊन पुढं जायचं. पण आयुष्यातील काही दिवस असतात त्या संकटांचे विस्मरण करुन आनंदाने कुटुंबासोबत जायचं असतं. दिवाळीत सर्व संकटं विसरुन एकत्र येण्याचा सण आहे. महाराष्ट्रात आणि देशात आनंदाने आणि उत्साहाने दिवाळी सण साजरा केला जातो. सर्वांना दिवाळी सण आनंदाने जावो. सर्वांना यश यावे. याच दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा, असंही खासदार शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरून शरद पवार आणि अजित पवार गटात वाद सुरू असताना दुसरीकडे आज दिवाळीनिमित्त पवार कुटुंब एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार सगळे स्नेहभोजनासाठी जमले होते. या कार्यक्रमानंतर अजित पवार दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. अजित पवार यांनी काल दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात ३ तास बैठक झाली.