प्रत्येक व्यक्तीमध्ये सुप्त गुण दडलेले असतात, फक्त ओळखता आले पाहिजेत : पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:08 AM2021-07-10T04:08:09+5:302021-07-10T04:08:09+5:30
पेरिविंकल स्कूलच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप-समारंभ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलच्या बावधन, सूस ...
पेरिविंकल स्कूलच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप-समारंभ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलच्या बावधन, सूस व पिरंगुट या तिन्ही शाखांच्या इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभ हा बावधन शाखेमध्ये झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुणे महानगरपालिकेच्या उपमहापौर सुनीता वाडेकर उपस्थित होते. या वेळी मंचावर संस्थेचे संस्थापक राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, हेमंत निंबाळकर, ॲड. जगदीश बेंडखळे, पंकज महाराज गावडे, क्रीडा पत्रकार संजय दुधाणे, विनोद माझिरे, कांबळे, मुख्याध्यापक नीलिमा व्यवहारे, अभिजित टकले, निर्मल पंडित, रुचिरा खानविलकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन पर्यवेक्षिका रश्मी पाथरकर, शिल्पा क्षीरसागर, शुभा कुलकर्णी, पूनम पांढरे, सना इनामदार व पल्लवी नारखेडे, जिनी नायर यांनी केले.
--
फोटो ओळ : पेरिविंकल स्कूलच्या दहावीच्या निरोप समारंभ कार्यक्रमप्रसंगी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश.
फोटो क्रमांक : ०९ पिरंगुट स्कूल