बुर्केगावमध्ये एकही बाधित रुग्ण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:11 AM2021-05-25T04:11:42+5:302021-05-25T04:11:42+5:30
पिंपरी सांडस : बुर्केगाव (ता. हवेली) गावामध्ये आजमितीस १९ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले असून, सध्या एकही कोरोनाबाधित ...
पिंपरी सांडस : बुर्केगाव (ता. हवेली) गावामध्ये आजमितीस १९ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले असून, सध्या एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. गावासाठी ही आनंददायी बाब असून आता कोरोनाला वेशीबाहेरच ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी दक्ष रहावे, असे आवाहन वाडेबोल्हाई आरोग्य केंद्राचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सचिन सूर्यवंशी व बुर्केगावचे सरपंच संतोष पवळे यांनी केले.
हवेलीच्या तहसलीदारांच्या आदेशानुसार, बुर्केगावमध्ये मागील आठवड्यात घरोघरी जाऊन नागरिकांची कोरोना लक्षणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये लहान बाळांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ऑक्सिजन, तापमान तपासण्यात आले. हे सर्वेक्षण लोणीकंद बसू विद्यालय, पेरणे जिल्हा परिषद शाळा, न्हावी सांडस, पिंपरी सांडस यातील एकूण २० शिक्षकांच्या व २ क्षेत्रीय अधिकारी संदीप गारकर, ज्ञानेश्वर गायकवाड, डॉ. महेश वडदरे, आरोग्य सेवक युवराज चव्हाण यांनी अगदी चोख पद्धतीने केले. एकाही पथकाला संपूर्ण गावात एकही कोरोनाची लक्षणे असलेले किंवा आजारी असलेले नागरिक निदर्शनास आले नाही. त्यामुळे सध्या कोरोना गावातून हद्दपार झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.
यावेळी कै. तात्याबा बाजारे यांच्या स्मरणार्थ एकनाथ बाजारे यांनी कोरोना तपासणीचे किट प्राथमिक आरोग्य केंद्राला दिले. या वेळी ग्रामसेवक राजेंद्र शिंदे, अमोल बाजारे, नितीन यनभर, ज्ञानेश्वर गायकवाड, बाजीराव ठोंबरे, राजेंद्र गुंड, गणेश बाजरे, भाऊसाहेब ठोंबरे, संतोष शिंदे, एकनाथ वाघमोडे, योगेश बाजरे, दीपाली बाजरे, बापूसाहेब कोकरे, रमेश बाजरे, रामदास ठोंबरे, प्रा. बबन ठोंबरे, संदीप थोरात, भरत यनभर, राजेंद्र बाजारे आदी उपस्थित होते.
--
फोटो २४ पिंपरी सांडस बुर्केगाव कोरोना फोटो ओळी : बुर्केगाव(ता. हवेली) येथे कोरोना तपासणीप्रसंगी आरोग्य यंत्रणेला मोफत किट देताना एकनाथ बाजारेसह सरपंच संतोष पवळे, ग्रामसेवक राजेंद्र शिंदे, डॉक्टर, शिक्षक.