झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नाहीत, तुम्ही फक्त गाड्या अडवण्याचे काम करता का? पोलिसालाच धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 10:34 AM2022-01-06T10:34:55+5:302022-01-06T10:35:02+5:30

चौकातील सर्व सिग्नल बंद करा, मला जाऊ द्या, असे म्हणून आरोपीने पोलिसासोबत अरेरावीही केली

There are no zebra crossing lanes do you police just intercept vehicles Pushing the police in bhosari | झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नाहीत, तुम्ही फक्त गाड्या अडवण्याचे काम करता का? पोलिसालाच धक्काबुक्की

झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नाहीत, तुम्ही फक्त गाड्या अडवण्याचे काम करता का? पोलिसालाच धक्काबुक्की

Next

पिंपरी : वाहतूक पोलिसासोबत हुज्जत घालत पोलिसाच्या वर्दीवर हात टाकून नेमप्लेट तोडल्याची घटना भोसरी येथील गुडलक चौकात सोमवारी (दि. ३) रात्री आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. दादाराव गोपाळ माने (वय ३५, रा. दत्तनगर, दिघी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस कर्मचारी दिनकर महाडिक यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महाडिक हे भोसरी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. भोसरी येथील गुडलक चौकात फिर्यादी हे सोमवारी कर्तव्यावर हजर होते. त्यावेळी आरोपी तिथे आला. चौकामध्ये झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे नाहीत. तुम्ही पोलीस काय फक्त गाड्या अडवण्याचे काम करता का, असे आरोपी म्हणाला.  चौकात झेब्रा क्रॉसिंग असून तू त्यावरून निघून जा, असे फिर्यादी महाडिक यांनी आरोपीला सांगितले. त्याचा आरोपीला राग आला. चौकातील सर्व सिग्नल बंद करा, मला जाऊ द्या, असे म्हणून आरोपीने फिर्यादीसोबत अरेरावी केली. फिर्यादी यांना धक्काबुक्की करून फिर्यादी यांच्या शर्टाची नेमप्लेट तोडून आरोपीने सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

Web Title: There are no zebra crossing lanes do you police just intercept vehicles Pushing the police in bhosari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.