विशेष बाल पोलीस पथकेच नाहीत
By admin | Published: November 14, 2014 11:53 PM2014-11-14T23:53:55+5:302014-11-14T23:53:55+5:30
एखाद्या लहानग्यास लैंगिक अत्याचाराने होरपळले असेल, तर त्याची चौकशी पोलिसी खाक्यात नव्हे, तर आपुलकीने व्हावी..
Next
हिनाकौसर खान-पिंजार - पुणो
एखाद्या लहानग्यास लैंगिक अत्याचाराने होरपळले असेल, तर त्याची चौकशी पोलिसी खाक्यात नव्हे, तर आपुलकीने व्हावी.. त्याने कायदा मोडला वा त्याचा रस्ता भरटकला, तरी त्याच्याशी दोस्ती करून तपासणी व्हावी, गुन्हेगारी पद्धतीने नव्हे!! गुन्हेगारी गर्तेत अडकलेली लहान मुले, तसेच अत्याचारग्रस्त मुलांचा प्रश्न संवेदनशील असल्याने तो तसाच हाताळावा म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनला विशेष बाल पोलिसांचे पथक असावे, असा कायदा सांगतो; मात्र पुण्यातील कोणत्याही पोलीस स्टेशनवर असे पथक नाही. लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना मोठय़ा प्रमाणात उजेडात येत आहेत; मात्र असे पथक प्रत्यक्षात नसल्याची धक्कादायक बाब आहे.
सध्या बहुतेक पोलीस स्टेशनवर विधिसंघर्षग्रस्त बालकांनाही मोठय़ा गुन्हेगारांप्रमाणोच वागणूक दिली जात असल्याचे वास्तव चित्र आहे.
‘बचपन बचाओ आंदोलना’ने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या निकालानुसार, तसेच बालन्याय कायदा 2क्क्क्च्या निर्देशानुसार, प्रत्येक पोलीस स्टेशनवर पोलिसांनी विशेष बाल पोलीस पथक स्थापन करून, या पथकात लहान मुलांशी मैत्रीने वागणारे पोलीस नेमणो अनिवार्य आहे. मात्र, शहरात असे कोणतेही पथक नेमलेलेच नाही. काही वेळा बालकांसंदर्भात काम करणा:या स्वयंसेवी संस्थांना बालके व संरक्षण निगडित पोलीस स्टेशनवरील वरिष्ठ पोलीस निरीक्षकच काम पाहतो, अशी माहिती देऊन बोळवण केली जाते.
लहान मुलांवरील अत्याचारासंदर्भात कायदा कडक झाल्याने असे प्रकार मोठय़ा प्रमाणात उजेडात येऊ लागले आहेत. अशा वेळी मुलांची पोलीस वर्दीत, तसेच चौकीवर चौकशी होऊ नये. मात्र, प्रत्यक्षात असे पथकच नसल्याने पोलीस स्टेशनवरच मुलांना हजर राहून चौकशीला सामोरे जावे लागते.
बालन्याय कायद्यानुसार विशेष बाल पोलीस पथक असा नियम बंधनकारक आहे; मात्र प्रत्यक्षात काम करताना आजतागायत पोलिसांकडे असे पथक असल्याचा अनुभव नाही आला. याबाबत विचारणा केल्यावर वरिष्ठ पोलीस अधिका:यावर ही कामगिरी असल्याचे सांगण्यात येते. लहान मुलांना त्यांच्या कलेने घेऊन चौकशी करणा:या पोलिसांची गरज आहे; मात्र प्रत्यक्षात हे पथकच नाही.
-अनुराधा सहस्रबुद्धे,
ज्ञानदेवी संचलित चाईल्ड लाईनच्या प्रमुख