महापालिकेत दोन स्वतंत्र विभागांची निर्मिती, सायकल व आॅप्टिकल फायबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 05:02 AM2018-04-08T05:02:04+5:302018-04-08T05:02:04+5:30

मावळते आयुक्त कुणाल कुमार यांनी पदभार सोडताना आपल्या दोन योजनांसाठी महापालिकेत दोन स्वतंत्र विभाग स्थापन करून त्यावर अभियंत्यांची नियुक्ती केली आहे. यासंबधीच्या आदेशावर त्यांनी शुक्रवारी स्वाक्षरीही केली व शनिवारी त्याची अंमलबजावणीदेखील झाली.

There are two independent departments, cycle and optical fiber in the municipal corporation | महापालिकेत दोन स्वतंत्र विभागांची निर्मिती, सायकल व आॅप्टिकल फायबर

महापालिकेत दोन स्वतंत्र विभागांची निर्मिती, सायकल व आॅप्टिकल फायबर

Next

पुणे : मावळते आयुक्त कुणाल कुमार यांनी पदभार सोडताना आपल्या दोन योजनांसाठी महापालिकेत दोन स्वतंत्र विभाग स्थापन करून त्यावर अभियंत्यांची नियुक्ती केली आहे. यासंबधीच्या आदेशावर त्यांनी शुक्रवारी स्वाक्षरीही केली व शनिवारी त्याची अंमलबजावणीदेखील झाली.
पार्किंग पॉलिसी व आॅप्टिकल फायबर इन्फ्रास्ट्रक्चर या दोन कामांसाठी कुणाल कुमार आग्रही होते. सभागृहात विरोधक तसेच सत्ताधाºयांकडूनही विरोध झाल्यानंतरसुद्धा त्यांनी या योजनांचा आग्रह सोडला नाही. अखेर सत्ताधाºयांना पटवून त्यांनी सभागृहात दोन्ही योजनांना बहुमताने मंजुरी मिळवलीच. सार्वजनिक पार्किंग धोरण हा विभाग आता प्रकल्प अभियंता श्रीनिवास बोनाला यांच्या नियंत्रणाखाली काम करेल. अधीक्षक अभियंता मदन अडारी, स्थापत्य विभागातील मिलिंद बापट, रोहिदास देवडे, सदानंद लिटके, संदीप पाटील, पंकज आंबे, योगेश नागणे हे अभियंते त्यांच्यासोबत काम करतील.

- येत्या काही वर्षांत शहरात निर्माण होणाºया इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी आॅप्टिकल फायबर इन्फ्रास्ट्रक्चर हा विभाग काम करेल. अधीक्षक अभियंता विजयकुमार शिंदे यांची या कक्षाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अजित बांबळे, संजीव गोंडाणे, रमेश काकडे, विश्वनाथ बोटे, पूनम बीडकर, सुशील मोहिते, राजश्री बने या अभियंत्यांची कक्षात नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्व अभियंते वेगवेगळ्या खात्यांमध्ये कार्यरत होते.

Web Title: There are two independent departments, cycle and optical fiber in the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे