पुण्यात तुर्तास पाणीकपात नाहीच, १५ मे नंतर आढावा घेणार - चंद्रकांत पाटील

By नितीन चौधरी | Published: April 26, 2023 02:22 PM2023-04-26T14:22:36+5:302023-04-26T14:23:20+5:30

शेतीसाठीचे दुसरे आवर्तन देऊनही शहराचा पाणीपुरवठा कपात न करता सुरळीत राहू शकतो

There is no immediate water cut in Pune it will be reviewed after May 15 Chandrakant Patil | पुण्यात तुर्तास पाणीकपात नाहीच, १५ मे नंतर आढावा घेणार - चंद्रकांत पाटील

पुण्यात तुर्तास पाणीकपात नाहीच, १५ मे नंतर आढावा घेणार - चंद्रकांत पाटील

googlenewsNext

पुणे: यंदा पाऊसमान कमी असल्याच्या अंदाज वर्तवण्यात आला असून याचा परिणाम पुण्याच्या पाण्यावर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र पुण्यात पाणी कपात होणार नाही असे स्पष्ट आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला सध्या धरणांमध्ये अकरा टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे शहराला प्रति महिना दीड टीएमसी पाणी लागते त्यानुसार पुढील चार महिन्यांसाठी सहा टीएमसी पाणी लागणार आहे सध्या खडकवासला धरणातून शेतीसाठी चे पहिले आवर्तन सुरू आहे यानंतरही दुसरे आवर्तन दिले जाणार आहे. असे असले तरी 31 ऑगस्ट पर्यंतचा विचार केल्यास शहराचा पाणीसाठा आणि शेतीसाठी लागणारे पाणी हे पुरेसे उपलब्ध असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले त्यामुळे शहरात पाणी कपात करू नये असे निर्देश पाटील यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.

वेगवेगळ्या हवामान विषयक अंदाज व्यक्त करणाऱ्या संस्था नुसार या घटकाचा प्रभाव मान्सूनवर होणार असून पावसाचे प्रमाण 96% पर्यंत असेल असे भारतीय हवामानशास्त्र विभागांना देखील जाहीर केले आहे. त्यामुळेच शेती आणि शहराचा पाणीपुरवठा याचे काटेकोर नियोजन करावे असे निर्देश पाटील यांनी जलसंपदा विभाग व महापालिकेचे अधिकाऱ्यांना दिले होते. आज झालेल्या बैठकीत याविषयी चर्चा करण्यात आली त्यानुसार धरणांमध्ये गेल्यावर्षी याच तारखेला उपलब्ध असलेल्या पाणीसाठापेक्षा यंदा अर्धा टीएमसी पाणीसाठा जास्त आहे. तसेच तसेच 31 ऑगस्ट पर्यंतचा विचार केल्यास सध्या अकरा टीएमसी साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतीसाठीचे दुसरे आवर्तन देऊनही शहराचा पाणीपुरवठा कपात न करता सुरळीत राहू शकतो असे अधिकाऱ्यांनी सांगितले. म्हणून  तूर्तास ही पाणी कपात टळली आहे. तरी देखील या संदर्भात पुढील पंधरा मी पर्यंत आढावा घेऊन निर्णय घेण्याचे या बैठकीत ठरले.

Web Title: There is no immediate water cut in Pune it will be reviewed after May 15 Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.