"बेपत्ता किंवा किडनॅपिंग असं काहीही नाहीये"; स्वतः तानाजी सावंत यांनीच दिली मुलाविषयी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 20:29 IST2025-02-10T20:28:42+5:302025-02-10T20:29:40+5:30

माजी मंत्री तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या प्रकाराबाबत माहिती दिली.

There is no kidnapping Tanaji Sawant himself gave information about the son | "बेपत्ता किंवा किडनॅपिंग असं काहीही नाहीये"; स्वतः तानाजी सावंत यांनीच दिली मुलाविषयी माहिती

"बेपत्ता किंवा किडनॅपिंग असं काहीही नाहीये"; स्वतः तानाजी सावंत यांनीच दिली मुलाविषयी माहिती

किरण शिंदे

लोकमत प्रतिनिधी : माजी मंत्री आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार तानाजी सावंत मुलगा ऋषीराज सावंत (Rishikesh Sawant) यांचे अपहरण झाल्याची माहिती समोर आली होती. पात्र या प्रकरणी आता स्वतः तानाजी सावंत यांनीच समोर येऊन माहिती दिली. आपला मुलगा बेपत्ता झाला किंवा त्याचे अपहरण झाले असं काहीही नाही. तर तो त्याच्या मित्रासोबत असल्याचे त्यांनी सांगितले. 

तानाजी सावंत म्हणाले, माझा मुलगा कुठल्याही अनोळखी मुलांसोबत नाही तर तो त्याच्या मित्रांसोबत आहे. तू बेपत्ता झाला किंवा त्याचे अपहरण झाले असा कुठलाही प्रकार नाही. दरम्यान तो रोज घरातून बाहेर जाताना आम्हाला सांगून जातो. मात्र आज असे काही झाले नाही त्यामुळे आम्हाला चिंता वाटली. माझा मुलगा आणि मी दिवसातून पंधरा ते वीस वेळेस फोनवर बोलत असतो. किंवा तो घरातून बाहेर जाताना मोठ्या मुलाला सांगत असतो. आज मात्र तो आम्हाला न सांगता दुसऱ्याच गाडीतून मित्रांसोबत विमानतळावर गेला असल्याचे चालकाने आम्हाला सांगितले. त्यामुळे चिंता वाटू लागल्याने मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणे पोलिसांना याची माहिती दिली. सध्या तो खाजगी विमानातून प्रवास करत असल्याची माहिती आहे. तू नेमका कुठे जात आहे, त्याच्यासोबत आणखी कोण कोण आहेत याविषयी कुठलीही माहिती नाही. 

दरम्यान सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एक फोन आला. त्यांनी तानाजी सावंत यांच्या मुलाला कुणीतरी घेऊन गेले असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस सतर्क झाले. त्यांची माहिती घेतली असता ते पुण्यातून विमानाने गेले असल्याचे समोर आले. ते विमान कुठे चालले आहेत याची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू सुरू असून सावंत यांच्या मुलाला परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला असून गुडी शाखा या गुन्ह्याच्या तपासाला लागली आहे.
 

Web Title: There is no kidnapping Tanaji Sawant himself gave information about the son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.