PMC Budget: पुणेकरांवर काेणतीही करवाढ नाही; 11 हजार 601 कोटींचे बजेट सादर

By राजू हिंगे | Published: March 7, 2024 12:39 PM2024-03-07T12:39:04+5:302024-03-07T12:56:40+5:30

गेल्या वर्षीच्या आयुक्तांच्या बजेटपेक्षा तब्बल 2हजार ०८६ कोटींनी जास्त

There is no tax hike on Pune residents 11 thousand 601 crore budget presented | PMC Budget: पुणेकरांवर काेणतीही करवाढ नाही; 11 हजार 601 कोटींचे बजेट सादर

PMC Budget: पुणेकरांवर काेणतीही करवाढ नाही; 11 हजार 601 कोटींचे बजेट सादर

पुणे: पुणेकरावर काेणतीही कर वाढ न करणारे महापालिकेचे २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे 11 हजार 601 कोटींचे बजेट आयुक्तांनी आज सादर केले. गेल्या वर्षीच्या आयुक्तांच्या बजेटपेक्षा तब्बल 2हजार ०८६ कोटींनी जास्त आहे. पालिकेच्या उत्पन्न्नावाढी साठी कोणताही ठोस पर्याय नसताना तब्बल कोटींनी हे बजेट फुगविले असल्यामुळे ते ‘ओव्हरस्मार्ट’ बजेट ठरले आहे.

महापालिकेच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीचे बजेट आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी आज सादर केले. पालिकेचे गेल्या वर्षी (२०२४-२५या वर्षासाठी) ९ हजार ५१५ कोटी रुपयांचे बजेट सादर केले होते. यंदा त्यामध्ये तब्बल २०८६ कोटींनी वाढ झाली आहे. २०२४-२५च्या बजेटमध्ये सेवकवर्ग खर्च ३ हजार ५५६कोटी रुपये दर्शविला आहे. 

महापालिका अर्थसंकल्प 

जमा 

- प्रॉपर्टी टॅक्स 2549.79 कोटी रुपये
- GST - 2502 कोटी
- विकास शुल्क - 2492.83 कोटी
- शासकीय अनुदान - 1762.17 कोटी
- कर्ज/कर्जरोखे - 450 कोटी

खर्च 

- सेवकवर्ग खर्च - 3556.90 कोटी
- भांडवली व विकासाची कामे - 5093.22 कोटी
- देखभाल दुरुस्ती व इतर खर्च - 1861.82 कोटी
- वीज खर्च व दुरुस्ती - 385.80 कोटी
- पाणी खर्च - 150 कोटी
- औषधे, पेट्रोल /डिझेल - 226.60 कोटी

Web Title: There is no tax hike on Pune residents 11 thousand 601 crore budget presented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.