जातीयवादी सरकारला पायउतार करण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 03:18 AM2019-04-01T03:18:33+5:302019-04-01T03:19:07+5:30

हर्षवर्धन पाटील : काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

There is a need to step down the communal government | जातीयवादी सरकारला पायउतार करण्याची गरज

जातीयवादी सरकारला पायउतार करण्याची गरज

Next

लोणावळा : जातीयवादी भाजप व शिवसेना सरकारला पायउतार करण्याकरिता प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याने आघाडीचा धर्म पाळावा, असे आवाहन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे. पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने लोणावळ्यात काँग्रेसचा मेळावा झाला. माजी खासदार अशोक अण्णा मोहोळ, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार दिलीप ढमढेरे, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जगताप उपस्थित होते.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘‘मतांचे विभाजन टाळण्याकरिता देशातील समविचारी पक्ष काँग्रेसच्या सोबत आले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसही आहे. सर्व मतभेद बाजूला ठेवून प्रत्येक कार्यकर्त्याने आघाडीचा धर्म पाळायचा आहे. जी खंत कार्यकर्त्यांची आहे तीच आमचीदेखील आहे़ मात्र ही वेळ आपापसांत वाद घालण्याची नसून, जातीयवादी पक्षांना रोखण्याची व मतांचे विभाजन टाळण्याची असल्याने काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आघाडीच्या प्रचारयंत्रणेत सहभागी व्हावे, असा पक्षादेश आहे.

विधानसभा जागांबाबत निर्णय वरिष्ठ घेतील
राष्ट्रवादी काँग्रेसचा लोकसभा जागांमध्ये इंटरेस्ट आहे तसा आमचा विधानसभांच्या जागेत आहे. पुणे जिल्ह्यात विधानसभेच्या २१ जागा आहेत़ यापैकी ज्या ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे त्या जागा काँग्रेसला मिळाव्यात.
- हर्षवर्धन पाटील

Web Title: There is a need to step down the communal government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.