न्यायाधीशांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षदा, अतिक्रमण काढण्यास सांगूनही कारवाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:29 AM2018-03-19T00:29:39+5:302018-03-19T00:29:39+5:30

इंदापूरच्या मुख्य न्यायाधीशांच्या सूचनेलाच इंदापूर नगरपालिकेने वाटाण्याच्या अक्षदा लावल्याचा प्रकार समोर आला आहे.

There is no action while asking the authorities to remove the encroachment of the judges | न्यायाधीशांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षदा, अतिक्रमण काढण्यास सांगूनही कारवाई नाही

न्यायाधीशांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षदा, अतिक्रमण काढण्यास सांगूनही कारवाई नाही

googlenewsNext

इंदापूर : इंदापूरच्या मुख्य न्यायाधीशांच्या सूचनेलाच इंदापूर नगरपालिकेने वाटाण्याच्या अक्षदा लावल्याचा प्रकार समोर आला आहे. इंदापूर न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारालगतच अनधिकृतपणे टाकण्यात आलेली चहाची टपरी व इतर पत्र्याचे शेड काढण्यासंदर्भात इंदापूरच्या मुख्य न्यायाधीशांनी तीन महिन्यांपूर्वी नगरपालिकेला लेखी सूचना देऊनही अद्यापपर्यंत काहीही कारवाई करण्यात आलेली नाही.
या निमित्ताने न्यायाधीशांच्या सूचनेचा अवमान करणारे नगरपरिषदेचे प्रशासन न्यायालयासह पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या कोणत्याही अतिक्रमणाबाबत कसलीही ठोस कारवाई करीत नसल्याची बाब पुढे आली आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाला लागूनच इंदापूरचे न्यायालय आहे. न्यायालयाच्या इमारतीत पाच न्यायालये कार्यरत आहेत. दररोज सुमारे पाचशे ते सहाशे पक्षकार न्यायालयीन कामकाजाकरिता तेथे येत असतात. १३० वकील व्यवसाय करत आहेत. तीन न्यायाधीशांची निवासस्थाने न्यायालयाच्या परिसराबाहेर आहेत. या सर्वांना कामकाजानिमित्त दुचाकी,चारचाकी वाहनांमधून न्यायालयात यावे लागते. या वाहनांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे न्यायालय परिसरात वाहने थांबवण्यासाठी असलेली जागा अपुरी पडते. ही स्थिती असताना प्रवेशद्वाराच्या बाहेर सार्वजनिक रस्त्यावर आजूबाजूस अनधिकृत, विनापरवाना चहाची टपरी व पत्र्याची शेड टाकून अनेकांनी व्यवसाय थाटलेले आहेत. न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आपली वाहने थांबवून लोक त्यांच्याकडे जात असतात. वाहनांच्या गर्दीमुळे न्यायालयात ये-जा करण्यास अडचणी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दि. १४ डिसेंबर २०१७ रोजी वकील संघटनेने इंदापूरचे मुख्य न्यायाधीश अ. अ. शेख यांच्याकडे तक्रारी अर्ज देऊन, ही सारी अतिक्रमणे काढण्यात यावीत,अशी मागणी केली. त्या अर्जाच्या अनुषंगाने न्यायाधीश शेख यांनी दि. १८ डिसेंबरला नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे अतिक्रमणे काढण्याविषयी पत्र दिले. हे पत्र देऊन तीन महिने उलटून गेले, तरी न्यायालयाच्या प्रवेशद्वारालगतची अतिक्रमणे हटवण्याबाबत कसलीही हालचाल केली नाही.
>महामार्गाच्या फुटपाथवरदेखील अतिक्रमण...
शहरातून जाणाºया महामार्गाचे रुंदीकरण झाले. त्यामध्ये दुभाजक टाकण्यात आला. दुतर्फा फुटपाथ तयार करण्यात आला. यानंतर तरी इंदापुरातील वाहतूककोंडी कमी होईल, अशी लोकांची अपेक्षा होती. मात्र, आधीपासूनच रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून लहान-मोठे व्यवसाय करणाºयांनी, रीतसर फुटपाथपर्यंत जागेची व्याप्ती वाढवली. ती जागा खडी-मुरुमाने भरून घेत, आपला माल फुटपाथवर ठेवून व्यवसाय करण्यास सुरुवात केली. चहा टपरीवाले फुटपाथवर खुर्च्या टाकून धंदा करताहेत. कडेला दुचाकी गाड्या लावल्या जात आहेत.

Web Title: There is no action while asking the authorities to remove the encroachment of the judges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.