‘विखे पाटलांच्या पोटात दुखण्याचे कारण नाही’

By admin | Published: September 23, 2015 03:10 AM2015-09-23T03:10:05+5:302015-09-23T03:10:05+5:30

राज्यातील दुष्काळाची स्थिती गंभीर असल्याने दृष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे दु:ख वाटून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे रस्त्यावर उतरले असतील

'There is no cause for pain in stomachs of stereotypes' | ‘विखे पाटलांच्या पोटात दुखण्याचे कारण नाही’

‘विखे पाटलांच्या पोटात दुखण्याचे कारण नाही’

Next

पुणे : राज्यातील दुष्काळाची स्थिती गंभीर असल्याने दृष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे दु:ख वाटून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे रस्त्यावर उतरले असतील त़र या वयात विखे पाटलांच्या पोटात दुखण्याचे कारण काय अशी टीका विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी पुण्यात केली.
राज्यात दुष्काळ जाहीर करावा तसेच राज्यातील शेतक-यांना मदत मिळावी या मागण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने मागील आठवडयात मराठवाडयामध्ये जेलभरो आंदोलन केले. या आंदोलनाचा समाचार घेत माजी मंत्री बाळासाहेब विखे पाटील राज्यात सत्तेवर असताना पवारांनी काहीच केले नाही. मराठवाडयाचे पाणी बारामतीला पळविल्यामुळे त्यामुळे मराठवाडयावरील दुष्काळी स्थितीस पवारच जबाबदार असल्याची टीका केली होती. याबाबत बोलताना मुंडे म्हणाले की, सिनियर विखे-पाटील हे वयाने मोठे आहेत. अशा वयस्कर माणसाबददल आपण बोल योग्य नाही. मात्र, दृष्काळी भागात काम करणा-या आपल्या सारख्या कार्यकर्त्याला या वक्तव्याचा खेद होतो. विखे पाटील हे सधन भागाचे नेतृत्त्व करणारे नेते आहेत. त्यामुळे राज्यातील दृष्काळाच्या छळा त्यांना काय माहित. मात्र, जर पवार साहेब हे राज्यातील दृष्काळीभागातील शेतक-यांचे दु:ख वाटून घेण्यासाठी रस्त्यावर उतरले असतील तर या वयात विखेंच्या पोटात दुखण्याचे कारण नाही.’’

Web Title: 'There is no cause for pain in stomachs of stereotypes'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.