कोणताही संभ्रम नाही; जिल्ह्यात शिक्षकांना ५० टक्के उपस्थितीचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:08 AM2021-06-18T04:08:46+5:302021-06-18T04:08:46+5:30
पुणे : जिल्ह्यातील प्राथमिक शाळा मंगळवारपासून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी ५ हजार ३८७ शाळांत शिक्षकांची शंभर टक्के ...
पुणे : जिल्ह्यातील प्राथमिक शाळा मंगळवारपासून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी ५ हजार ३८७ शाळांत शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती होती. मात्र, शिक्षण संचालक द. गो. जगताप यांच्या आदेशानुसार बुधवारपासून प्राथमिक शाळेतील शिक्षकांची उपस्थिती ५० टक्के ठेवण्यात आली आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी स्मिता गौड यांनी दिली.
राज्यातील काही जिल्ह्यात शिक्षण संचालक आणि जिल्हा परिषदेने शिक्षकांच्या उपस्थितीबाबत वेगवेगळे आदेश काढल्याने संभ्रम, गोंधळाचे वातावरण विविध पाहायला मिळत आहे. मात्र, पुणे जिल्ह्यात शिक्षण संचालक यांनी काढलेल्या आदेशाचे पालन करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेने कोणताही स्वतंत्र आदेश काढलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
-------
पॉइंटर्स
* जिल्ह्यातील एकूण शाळा :- ५३८७
* जिल्हा परिषदेच्या एकूण शाळा :- ३६४८
* जिल्ह्यातील एकूण अनुदानित शाळा :- ३१२
* जिल्ह्यातील एकूण विनाअनुदानित शाळा :- ८४४
* जिल्ह्यातील एकूण शिक्षक :- ३०,७२७
-------
संचालकांचे पत्र
शिक्षण संचालक कार्यालयाने १४ जून २०२१ रोजी जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत शिक्षकांना उपस्थित राहण्यासाठी ५० टक्के उपस्थितीचे आदेश दिले आहेत. त्याची पुणे जिल्ह्यात अंमलबजावणी होत आहे.
-------
जिल्हा परिषदेचे पत्र
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाने शिक्षकांच्या उपस्थितीबाबत स्वतंत्र कोणताही आदेश काढला नाही. शिक्षण संचालक कार्यालयाच्या आदेशानुसार शिक्षकांची शाळांमध्ये उपस्थिती असते.
-------
शिक्षण संचालक यांनी काढलेला आदेश हा संपूर्ण राज्याला लागू असतो. त्यामुळे जिल्हा परिषदेने स्वतंत्र आदेश काढण्याचा प्रश्नच नाही.
- स्मिता गौड, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, पुणे जिल्हा परिषद
---------
शिक्षक काय म्हणतात...
शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशाचे आम्ही पालन करत आहोत. जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत शिक्षकांची रोज ५० टक्के उपस्थिती असते.
- राजेंद्र बोराटे, शिक्षक
----------
सध्या आम्हाला ५० टक्के उपस्थितीचे आदेश मिळाले आहे. त्याचे पालन करतो. त्यामुळे कोणताही संभ्रम नाही.
- वैशाली खुर्पे, शिक्षिका