भीमाशंकर येथील मंदिरात पाणी शिरल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:12 AM2021-07-28T04:12:11+5:302021-07-28T04:12:11+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क तळेघर : बारा ज्योर्तिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदीरामध्ये पाणी गेल्याची बातमी सगळीकडे पसरली. मात्र, ...

There is no fact in the news that water has infiltrated in the temple at Bhimashankar | भीमाशंकर येथील मंदिरात पाणी शिरल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही

भीमाशंकर येथील मंदिरात पाणी शिरल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

तळेघर : बारा ज्योर्तिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदीरामध्ये पाणी गेल्याची बातमी सगळीकडे पसरली. मात्र, यात काही तथ्य नाही असा खुलासा भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष अॅड. सुरेश कौदरे यांनी केला.

आंबेगाव व खेड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये बुधवार (दि.२१) व गुरुवारी (दि.२२) रोजी मुसळधार पावसाने अक्षश: थैमान घातले. यामध्ये बुधवारी संध्याकाळ पासुन सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदी उगम स्थानापासुन त्याच प्रमाणे मंदीर परिसर पाऱ्यांवरील पाणी मोठ्या प्रमाणात भिमा पात्रामध्ये आले. परंतु, सध्या मंदिराच्या नुतनीकरणाचे काम पुरातत्व विभागाकडुन चालु असल्यामुळे मंदिराच्या वती भोवती संपुर्ण राडारोडा पडला आहे. यामुळे मंदीराच्या आजुबाजुला साचलेले पाणी गोमुखातुन आतमध्ये शिरुन शिवलिंगा वरती गेले.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण व आहुपे या खोऱ्यामध्ये झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे आदिवासी बांधवांच्या झालेल्या शेतीच्या बांधबंदिस्तीचे, पिकांचे, घरांचे व गोठ्यांचे, डोंगर माथ्यावरील रस्त्यांचे प्रमाणांत नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पहाणी केली. या वेळी तळेघर येथे झालेल्या बैठकीत, भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांनी या बाबत म्हणाले की, भीमाशंकर मंदीरामध्ये पाणी गेल्याची बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. मात्र, यात काही तथ्य नाही. मंदीरा जवळुन गेलेल्या भीमानदी पात्रामध्ये कचरा अडकल्याने मंदीरा जवळ पाणी साचुन गोमुखामधुन पाणी मंदीराच्या गाभाऱ्यामध्ये गेले. देवस्थानच्या विश्वस्तांनी हे पाणी तात्काळ बाहेर काढले. भीमाशंकरमध्ये मुसळधार पाऊस हा नित्याचाच असतो. तेथे मोठे असे काही झाले नाही. त्यामुळे कुणीही घाबरुण जायचे काही कारण नाही. या वेळी माजी समाजकल्याण सभापती सुभाष मोरमारे, राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्राच्या संचालिका पुर्वा वळसे, जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष विष्णु हिंगे, पंचायत समिती सभापती संजय गवारी, जिल्हा परिषद सदस्या रुपा जगदाळे आदी उपस्थित होते.

चौकट

बाराज्योर्तीर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदीराजवळ चार पोलिसांची कायमस्वरुपी नेमणुक करण्यात आली आहे. परंतु कोरोना सुरु झाल्यापासुन येथील पोलिस मुख्यालयाने काढुन घेतले होते. ही बाब देवस्थानचे उपकार्यकारी विश्वस्त मधुकरशास्त्री गवांदे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निर्दशनास आणुन दिली. यावेळी वळसे पाटील यांनी तात्काळ पोलिस उपअधिक्षक विवेक पाटील यांना भीमाशंकर येथे पोलिस नेमण्याच्या सुचना दिल्या.

फोटो:-तळेघर (ता. आंबेगाव) येथील बैठकीत बोलताना श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान अध्यक्ष अॅड सुरेश कौदरे शेजारी राज्याचे गृहमंञी दिलीप वळसे पाटील व इतर मान्यवर

Web Title: There is no fact in the news that water has infiltrated in the temple at Bhimashankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.