रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी निधी नाही, नाही तर आंदोलन उभारणार - सुप्रिया सुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 01:58 AM2017-09-16T01:58:19+5:302017-09-16T01:58:41+5:30
दौंड स्थानकप्रमाणे नीरा येथेही सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करणार आहे. रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी वेगळा निधी अद्यापही मिळालेला नाही. सहा महिन्यांत निधी उपलब्ध झाला नाही तर आंदोलन उभारणार आहे. स्टेशनमध्ये सोयी-सुविधा व्हाव्यात, याकरिता निधीच्या उपलब्धतेसाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार आहे, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
नीरा : ‘सांसद आदर्श ग्राम योजनेप्रमाणेच खासदारांनी आदर्श रेल्वे स्थानक निर्माण करण्याचे आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील नीरा, जेजुरी व दौंड ही तीन रेल्वेस्थानके आदर्श स्थानके करायची आहेत.
दौंड स्थानकप्रमाणे नीरा येथेही सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करणार आहे. रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी वेगळा निधी अद्यापही मिळालेला नाही. सहा महिन्यांत निधी उपलब्ध झाला नाही तर आंदोलन उभारणार आहे. स्टेशनमध्ये सोयी-सुविधा व्हाव्यात, याकरिता निधीच्या उपलब्धतेसाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार आहे, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
सुप्रिया सुळे यांनी नीरा येथे भेट देऊन विविध विकासकामांची पाहणी केली. रेल्वे स्थानकाला भेट दिली तेव्हा त्या बोलत होत्या.
या वेळी जिल्हा राष्ट्रवाद काँग्रेसचे अध्यक्ष जालिंदर कामठे, प्रा. दिगंबर दुर्गाडे, तालुकाध्यक्ष शिवाजी पोमण, माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रमोद काकडे, नीरेचे उपसरपंच बाळासाहेब भोसले, सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मण गोफणे, विजय शिंदे, दत्ताजी चव्हाण, रेखा चव्हाण, नाना जोशी, दीपक काकडे, पृथ्वीराज काकडे, स्मिता काकडे यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
सुळे यांनी नुकतेच महावितरणाच्या उपकेंद्राचे पूर्ण झाल्या कामाची पाहणी केली. पूर्वीची व आताची परिस्थिती तसेच नवीन उपकेंद्रामुळे किती लोकांना लाभ झाला, याची माहिती शाखा अभियंता बाळासाहेब फासगे यांच्याकडून घेतली.
नव्याने बांधण्यात येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. त्यानंतर रेल्वे स्थानकाला भेट देऊन अधिकाºयांशी चर्चा केली.
यापूर्वी माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे यांनी वेळोवेळी नीरा रेल्वे स्थानकातील समस्यांविषयी सुळे यांना कल्पना दिली होती. त्यातली पार्किंग व्यवस्था सुरू झाली आहे. शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय सुरूहोईल. मुख्य प्लॅटफॉर्मच्या विरुद्ध दिशेला बाकांसह आकर्षक निवारा उभारला आहे, असे अधिकाºयांनी सांगितले.