'पीएमपी' ला गणपतीबाप्पाचा ''प्रसाद ''नाहीच  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 07:00 AM2019-09-20T07:00:00+5:302019-09-20T07:00:02+5:30

गणेशोत्सवाच्या काळात ' पीएमपी' कडून ६०० जादा बसचे नियोजन करण्यात आले होते.

There is no Ganapatibappa's "Prasad" to the PMP | 'पीएमपी' ला गणपतीबाप्पाचा ''प्रसाद ''नाहीच  

'पीएमपी' ला गणपतीबाप्पाचा ''प्रसाद ''नाहीच  

googlenewsNext
ठळक मुद्देउत्पन्नात अपेक्षित वाढ नाहीदहा दिवसांत केवळ चार वेळा पीएमपीचे उत्पन्न दीड कोटींच्या गेले पुढे

पुणे : गणेशोत्सवामध्ये गणेशभक्तांना सेवा देण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) जादा बस सेवा सुरू केली होती. मात्र, या सेवेला प्रवाशांचा अपेक्षित प्रसिताद मिळालेला नाही. या कालावधीत केवळ एकच दिवस पीएमपीला पावणे दोन कोटी रुपयांच्या पुढे दैनंदिन उत्पन्न गाठता आले. दहा दिवसांत केवळ चार वेळा पीएमपीचे उत्पन्न दीड कोटींच्या पुढे गेले. 
गणेशोत्सवाच्या काळात ' पीएमपी' कडून ६०० जादा बसचे नियोजन करण्यात आले होते. दैनंदिन संचलनातील बस रात्री १० वाजेपर्यंत सोडण्यात आल्या. तर त्यानंतर मध्यरात्री १ वाजेपर्यंत जादा बस यात्रा विशेष म्हणून धावल्या. या बसच्या प्रचलित दरामध्ये पाच रुपयांची जादा दरआकारणी करण्यात आली. तसेच पासची सवलत रात्री १२ वाजेपर्यंत देण्यात आली. पुणे व पिंपरी चिंचवडमधील विविध स्थानकांतून बसचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, यंदा पीएमपी बससेवाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. ह्यपीएमपीह्णला दैनंदिन उत्पन्न १ कोटी ४० लाख ते दीड कोटीपर्यंत मिळते. गणेशोत्सवातील पहिल्या दिवशी अपेक्षेप्रमाणे मार्गावरील कमी बस तसेच प्रवाशांची संख्या रोडावल्या उत्पन्न १ कोटी रुपयांच्या आत राहिले. तर दुसºया दिवशी हे उत्पन्न १ कोटी ६२ लाखांवर गेले. त्यानंतर पुढील पाच दिवस दीड कोटींचा टप्पाही गाठता आला नाही. 
अखेरचे तीन दिवस प्रवाशांमध्ये काहीशी वाढ झाल्याचे उत्पन्न मिळालेल्या उत्पन्नावरून दिसते. दि. ९ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवातील सर्वाधिक १ कोटी ८० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतरचे दोन दिवस दीड कोटीच्या किंचित पुढे गेले. पण तिकीट दर ५ रुपयांनी वाढवूनही उत्पन्नात अपेक्षित वाढ झालेली दिसत नाही. यंदाच्या गणेशोत्सवात अधूनमधून पावसाच्या सरी बरसत होत्या. तसेच शहराच्या मध्यभागातील रस्ते या काळात  सायंकाळनंतर बंद करण्यात येत होते. तर शिवाजी रस्ता अकरा दिवस बंद ठेवण्यात आला होता. अनेक पुणेकरांनी खासगी वाहनांचा वापर केला. परिणामी जादा बसला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, असे अधिकाºयांनी सांगितले.
------------------
ह्यपीएमपीह्णचे गणेशोत्सवातील दैनंदिन उत्पन्न
दिवस               उत्पन्न
दि. २         ९५,७०,१२८
दि. ३        १,६२,९०,३२०
दि. ४        १,४४,८५,७१९
दि. ५        १,४६,०५,५१५
दि. ६        १,३०,७३,३०४
दि. ७        १,५०,०८,८६६
दि. ८        १,३८,०५,३७१
दि. ९                      १,८०,१९,४४२
दि. १०                  १,५४,१३,९९६
दि. ११                  १,५६,९९,३२९
 

Web Title: There is no Ganapatibappa's "Prasad" to the PMP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.