उपासनेत स्त्री-पुरुष भेदभाव नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2016 04:09 AM2016-01-30T04:09:56+5:302016-01-30T04:09:56+5:30

२१व्या शतकात स्त्रियांनी उपासना करावी की नाही याबाबत चर्चा होते, हे दुर्दैव आहे. राजर्षी शाहू महाराजांचा समतेचा विचार रुजविण्यात आपण मागे पडलोय. मात्र असा भेदभाव आम्ही राज्यकर्ते

There is no gender discrimination in worship | उपासनेत स्त्री-पुरुष भेदभाव नको

उपासनेत स्त्री-पुरुष भेदभाव नको

Next

पुणे : २१व्या शतकात स्त्रियांनी उपासना करावी की नाही याबाबत चर्चा होते, हे दुर्दैव आहे. राजर्षी शाहू महाराजांचा समतेचा विचार रुजविण्यात आपण मागे पडलोय. मात्र असा भेदभाव आम्ही राज्यकर्ते कधीच होऊ देणार नाही, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. चौथऱ्यावर जाऊन शनीचे दर्शन घेण्याची संधी महिलांनीही द्यावी, यासाठी महिला संघटनांकडून आवाज उठवला जात आहे. भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यासाठी आंदोलनही छेडले. मात्र हे आंदोलन दडपून टाकण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या आधी कोल्हापूरचे शाहू छत्रपती महाराज यांनीही काही मंदिरांमध्ये स्त्रियांना गाभाऱ्यापर्यंत प्रवेश दिला जात नाही, याबाबत खेद व्यक्त केला. मंदिरांमध्ये जाण्याचा अधिकार पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: There is no gender discrimination in worship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.