धनादेश मिळूनही पैसे नाही

By admin | Published: December 24, 2016 12:53 AM2016-12-24T00:53:35+5:302016-12-24T00:53:35+5:30

कामाचा मोबदला म्हणून धनादेश मिळाला; परंतु बँकेतून एवढी रक्कम काढता येत नाही, असे सांगून धनादेश नाकारल्याची

There is no money in the check | धनादेश मिळूनही पैसे नाही

धनादेश मिळूनही पैसे नाही

Next

कोथरूड : कामाचा मोबदला म्हणून धनादेश मिळाला; परंतु बँकेतून एवढी रक्कम काढता येत नाही, असे सांगून धनादेश नाकारल्याची घटना कोथरूडमध्ये घडली आहे. नथुराम येडगे यांनी सांगितले, की त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना ८१०० रुपयांचा धनादेश मिळाला होता. तो घेऊन बँकेत गेले असता बँकेने पाच हजारांपेक्षा जास्त रुपये देता येत नाही असे कारण सांगून धनादेश स्वीकारण्यास नकार दिला. येडगे म्हणाले की, माझ्या कष्टाचे पैसे असून मला मिळत नाही, ही खूप क्लेशदायक बाब आहे. ८००० ही रक्कम काही फार जास्त नाही. उद्योगपती, राजकारण्यांना वाट्टेल तेवढी रक्कम दिली जाते; परंतु सर्वसामान्यांना नाडले जाते. आता आम्ही दाद तरी कोणाकडे मागावी. यासंदर्भात संबंधित बँकेच्या व्यवस्थापकाशी संपर्क होऊ शकला नाही.(वार्ताहर)

Web Title: There is no money in the check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.