चहा ला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच ; पुणेकरांची भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 08:05 PM2018-12-15T20:05:48+5:302018-12-15T20:08:54+5:30
चहा आणि पुणेकरांचं एक अतूट नातं आहे. पुण्यात प्रत्येक रस्त्यावर एकतरी अमृततुल्य असतंच. चहा शिवाय पुणेकरांचा दिवस सुरु होत नाही. पुण्यात चहाच्या दुकानांचे अनेक ब्रँड्स असून लोकांची त्याला मोठी पसंती मिळत आहे.
पुणे : चहा आणि पुणेकरांचं एक अतूट नातं आहे. पुण्यात प्रत्येक रस्त्यावर एकतरी अमृततुल्य असतंच. चहाशिवाय पुणेकरांचा दिवस सुरु होत नाही. पुण्यात चहाच्या दुकानांचे अनेक ब्रँड्स असून लोकांची त्याला मोठी पसंती मिळत आहे.
पुण्यातील विविध भागांमध्ये स्वतंत्रपूर्व काळापासून अनेक अमृतुल्य असून त्यातील अनेक अमृततुल्य जुन्याच पद्धतीने ठेवण्यात आली आहेत. पुणेकर चहाला अमृताची उपमा देतात, म्हणून चहाच्या दुकानांना अमृततुल्य म्हंटले जाते. सकाळी या ठिकाणी मोठी गर्दी असते. तसेच संध्याकाळी देखील सारखीच परिस्तिथी असते. कालानुरूप चहाच्या दुकानांमध्ये देखील मोठे बदल झाले.
नुकताच पुण्यातील तंदुरी चहा गाजला होता. त्याचबराेबर कडक स्पेशल, इराणी चहा, बासुंदी चहा, लेमन टी, ब्लॅक टी, काश्मिरी कावा अश्या विविध प्रकारचे चहा पुण्यात मिळतात. तरुणांना आकर्षित करण्यासाठी चहाच्या दुकानांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे. 10 रुपयांपासून ते 40 रुपयांपर्यंत चे चहा पुण्यात मिळतात. पुण्यातील कडक स्पेशल चहाच्या दुकानदाराने दुकानात आपल्या इंजिनेअरिंगच्या डिग्रीला हार घालून हीचा उपयोग फक्त नोकरी मिळण्यासाठी झाला असे लिहिले आहे. तर सिंहगड इन्स्टिट्यूट च्या एका प्राध्यापकाने नोकरी सुटल्यामुळे चहाचे दुकान सुरु केले. पुण्यात केवळ चहाची अनेक नवीन दुकाने सुरु होत असून नागरिकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अांतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्त चहाचे तुमच्या अायुष्यात काय स्थान अाहे असा प्रश्न पुणेकरांना अाम्ही केला. राेहित सुपेकर म्हणाला, चहा हा माझ्यासाठी मैत्रिचे एक प्रतिक अाहे. नवं नातं तयार करणारा एक दुवा अाहे. चहा माझे कामाचे दडपण दूर करताे. तर कार्तिकी पठारे म्हणाली, चहा शिवाय माझ्या दिवसाची सुरुवात हाेत नाही. चहाशिवाय माझं पानही हालत नाही. निरंजन गलांडे म्हणताे, चहा हा चहा असताे. मला अालेला कामाचा ताण एक कप चहा क्षणार्धात दूर करताे. चहा पिण्यासाठी मी अनेकदा पुणे ते लाेणावळा प्रवास सुद्धा करताे. पुण्यात मिळणारे सर्व प्रकारच्या चहांचा अास्वाद मी घेतला अाहे.