जिल्ह्यात तीन लाख ७९ हजार मतदारांचे छायाचित्रच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:11 AM2021-07-07T04:11:32+5:302021-07-07T04:11:32+5:30

रंगीत छायाचित्र जमा करण्याचे आवाहन : अन्यथा मतदारांची नावे वगळणार पुणे : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांत एकूण ७८ ...

There is no photograph of three lakh 79 thousand voters in the district | जिल्ह्यात तीन लाख ७९ हजार मतदारांचे छायाचित्रच नाही

जिल्ह्यात तीन लाख ७९ हजार मतदारांचे छायाचित्रच नाही

Next

रंगीत छायाचित्र जमा करण्याचे आवाहन : अन्यथा मतदारांची नावे वगळणार

पुणे : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांत एकूण ७८ लाख ८७ हजार ८७४ मतदार आहेत. मात्र, यातील ३ लाख ७९ हजार ९३३ मतदारांचे ओळखपत्रांवर रंगीत छायाचित्र नाही. त्यामुळे या मतदारांनी तातडीने रंगीत छायाचित्र जमा करावीत. अन्यथा त्यांचे मतदार यादीतून नाव वगळण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

जिल्ह्यातील वडगावशेरी ७० हजार ७११, हडपसर ५० हजार २२२, कोथरूड ४६ हजार ८८९, शिवाजीनगर ३० हजार ४७४ या चार मतदारसंघांत सर्वांत जास्त मतदारांचे रंगीत छायाचित्र जमा न करणाऱ्या मतदारांची संख्या आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तेरा तालुक्यांतील तहसील कार्यालयात छायाचित्र जमा करण्याचे काम सुरू केले आहे. येत्या आठवड्याभरात मतदारांनी तहसील कार्यालयात जाऊन आपले रंगीत छायाचित्र सादर करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

-----

जिल्ह्यातील २१ मतदारसंघांतील आकडेवारी

* जिल्ह्यातील एकूण मतदार :- ७८,८७,८७४

* पुरुष मतदार :- ४१,२८,३९२

* स्त्री मतदार :- ३७,५९,२८९

* तृतीयपंथी मतदार :- १९३

छायाचित्र न दिलेले मतदार :- ३,७९,९३३

----

छायाचित्र जमा करण्यासाठी डेडलाईन

मतदारांनी रंगीत छायाचित्र जमा करण्यासाठी निश्चित डेडलाईन प्रशासनाने दिलेली नाही. मात्र, येत्या आठवड्याभरात छायाचित्र जमा करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

-----

...येथे जमा करावीत छायाचित्र

हवेली, शिरूर, भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, दौंड, पुरंदर, बारामती आणि इंदापूर या तेरा तालुक्यांतील तहसील कार्यालयात रंगीत छायाचित्र जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

----

कोट

सध्या जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी या पदावर कोणत्याही अधिकाऱ्याची नेमणूक केलेली नाही. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तेरा तहसील कार्यालयात मतदारांचे रंगीत छायाचित्र अपडेट करण्याचे काम सुरू आहे.

- जिल्हा प्रशासन, पुणे

-----

जिल्ह्यातील विधानसभानिहाय रंगीत छायाचित्र नासलेल्यांची आकडेवारी

विधानसभा छायाचित्र नसलेले मतदार

जुन्नर २८

आंबेगाव १५३

खेड-आळंदी ५०३

शिरूर-हवेली ११२०२

दौंड ११५८३

इंदापूर ७११९

बारामती ०

पुरंदर ६१८३

भोर १५८३

मावळ २२७१

चिंचवड ७१७६

पिंपरी १३५२७

भोसरी ३२४६

वडगावशेरी ७०,७११

शिवाजीनगर ३०,४७६

कोथरूड ४६, ८८९

खडकवासला ४७, ७८९

पर्वती २३, ५८०

हडपसर ५०,२२२

पुणे कॅन्टोन्मेंट २९, ७८५

कसबा पेठ १५,९०९

एकूण ३,७९,९३३

Web Title: There is no photograph of three lakh 79 thousand voters in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.