मृत्यू लपविण्याचे कारणच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:12 AM2021-06-16T04:12:43+5:302021-06-16T04:12:43+5:30
(मृत्यू नोंदणी उशीर बातमीसाठी चौकटी व कोट) मृत्यू लपविण्याचे कारणच नाही पुणे महापालिका कार्यक्षेत्रात दररोज किती कोरोनाबाधित रुग्णवाढ झाली, ...
(मृत्यू नोंदणी उशीर बातमीसाठी चौकटी व कोट)
मृत्यू लपविण्याचे कारणच नाही
पुणे महापालिका कार्यक्षेत्रात दररोज किती कोरोनाबाधित रुग्णवाढ झाली, किती तपासण्या झाल्या, किती रुग्ण गंभीर आहेत, किती जण कोरोनामुक्त झाले, याचबरोबर किती जणांचा मृत्यू झाला याची माहिती आरोग्य विभागाकडून नित्याने सादर करण्यात येत आहे़ कोरोनाबाबतची ही आकडेवारी सर्व यंत्रणांना दिली जाते़ मात्र याची नोंद शासनाच्या पोर्टलवर करताना ती तपशीलवार करावी लागते़ यामध्ये मृत्यूची सर्व कारणे नमूद करावी असल्याने यास उशीर लागत आहे़ त्यामुळे शहरातील मृत्यू लपविण्याचे कारणच नाही़
- डॉ़ संजीव वावरे
साथरोग नियंत्रण अधिकारी तथा सहायक आरोग्य अधिकारी पुणे मनपा़
-------------------------
शहरातील कोरोना आपत्तीमधील कोरोनाबाधितांचे मृत्यू
सन २०२० : मार्च : २, एप्रिल : ८३, मे : २२९, जून : ३२९, जुलै : ६६९, आॅगस्ट : ९९२, सप्टेंबर : १ हजार १८२, आॅक्टोबर : ७४१, नोव्हेंबर : २३७, डिसेंबर : १६७़
सन २०२१ : जानेवारी : १३३, फे ब्रुवारी : ९१, मार्च ४४७, एप्रिल : १ हजार ४९५, मे १ हजार ४५९ व ६ जून पर्यंत १२५़
(कोरोना आपत्ती सुरू झाल्यापासून मार्च २०२० ते ६ जून २०२१ पर्यंत शहरात कोरोनामुळे ८ हजार ३७७ एवढे मृत्यू झाले़ ही आकडेवारी पुणे महापालिका हद्दीत रहिवासी असलेल्या व्यक्तींची आहे़ याव्यतिरिक्त पुणे शहराबाहेरून येऊन पुण्यात उपचार घेणाऱ्या पण मृत्यू झालेल्या कोरोनाबाधितांचा यात समावेश नाही़)