जिल्ह्यातील ९३ शाळांची नोंदच नाही

By admin | Published: October 17, 2015 01:03 AM2015-10-17T01:03:35+5:302015-10-17T01:03:35+5:30

बनावट पट व शाळांचा भंडाफोड ‘सरल’च्या नोंदीमुळे झाला आहे. नोंदीसाठी १५ आॅक्टोबर हा शेवटचा दिवस असला तरी आज दिवसभर सर्व्हर डाऊन होता. १३ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील ९३ शाळांची नोंदच झाली नव्हती.

There is no record of 93 schools in the district | जिल्ह्यातील ९३ शाळांची नोंदच नाही

जिल्ह्यातील ९३ शाळांची नोंदच नाही

Next

पुणे : बनावट पट व शाळांचा भंडाफोड ‘सरल’च्या नोंदीमुळे झाला आहे. नोंदीसाठी १५ आॅक्टोबर हा शेवटचा दिवस असला तरी आज दिवसभर सर्व्हर डाऊन होता. १३ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील ९३ शाळांची नोंदच झाली नव्हती.
तसेच ३५ हजार ६0८ विद्यार्थी
बोगस असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज या सॉफ्टवेअरमध्ये नोंदी करण्याचा शेवटचा दिवस होता.
मात्र, सकाळपासूनच ही वेबसाईट चालूच होत नसल्याने रात्री उशिरापर्यंत याची आकडेवारी मिळू शकली नाही.
राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना शालेय
दस्तऐवज संगणीकृत करण्याच्या सूचना सरकारने दिल्या होत्या. यात जिल्ह्यातील एकूण शाळा, चालू शाळा, विद्यार्थी संख्या याचबरोबर सुविधांची माहिती यात
भरावयाची होती. ही माहिती भरण्यासाठी १५ आॅक्टोबर ही शेवटची तारीख होती. मात्र आज ही साईटच ओपन झाली नसल्याने बहुतांश शाळांना नोंदीच करता आल्या नाहीत.
वर्षभरापूर्वी जिल्ह्यातील शाळांची पटसंख्येची माहिती
शासनाने मागविली होती. त्यात जिल्ह्यातील १३ तालुक्यांत ५ हजार २९३ शाळांमध्ये ९ लाख ४६ हजार ५८३ विद्यार्थीसंख्या असल्याचे शिक्षण विभागाने
कळविले होते.
त्या माहितीच्या अधारे ‘सरल’च्या माध्यमातून आॅनलाईन नोंदी करण्याचे आवाहन शाळांना शासनाने केले होते. १३ आॅक्टोबरपर्यंत या माध्यमातून झालेल्या नोंदींनुसार जिल्ह्यात ५ हजार २00 शाळा सुरू असल्याचे समोर आले आहे. म्हणजे ९३ शाळांच्या अद्याप नोंदीच
झाल्या नाहीत.
जर शेवटच्या दोन दिवसांत काही शाळांनी नोंदी केल्या असल्या तरी सुमारे ६0 ते ६५ शाळा या विविध कारणांनी बंद असल्याचे सुत्रांनी सांगितले. यात कमी पटसंख्या हे महत्वाचे कारण आहे.
(प्रतिनिधी)
>>३५,६०८ विद्यार्थी गायब
जिल्ह्यातील ९ लाख ४६ हजार ५८३ विद्यार्थ्यांपैकी ९ लाख १० हजार ९७५ विद्यार्थ्यांच्या नोंदी झाल्या आहेत. सुमारे ३५ हजार ६०८ विद्यार्थी गायब आहेत. यातही सर्वाधिक हवेली तालुक्यात २७ हजार २५१, जुन्नरमध्ये ३ हजार ५१६, मुळशीत १ हजार १८४, दौंडमध्ये १ हजार १२४ तर भोरमध्ये १ हजार ११५ विद्यार्थ्यांची नोंदच नाही. इतर तालुक्यांत मावळमध्ये ९६७, आंबेगावमध्ये ९४३, खेडमध्ये ५४६, शिरूरमध्ये ४४०, विद्यार्थ्यांच्या नोंदी नाहीत., तर इंदापूर तालुक्यात शाळांची संख्या कमी होऊनही विद्यार्थिसंख्या १ हजार २४ नी वाढली आहे. त्यापाठोपाठ बारामतीती ३१५, पुरंदरमध्ये १२५ तर वेल्हेमध्ये १३ विद्यार्थी जास्त झाले आहेत.
>>शेवटच्या दिवसापर्यंत ज्या शाळांच्या नोंदी झाल्या नाहीत, त्या कशामुळे बंद आहेत किंवा त्यांनी का नोंदी केल्या नाहीत, याची माहिती घेण्याच्या सूचना तालुका शिक्षण अधिकाऱ्यांना दिल्या जातील. त्यानंतरच वास्तव परिस्थिती समोर येईल.
- संजय नाईकडे, उपशिक्षणाधिकार, प्राथमिक

Web Title: There is no record of 93 schools in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.