‘प्रथम प्राधान्य’ फेरीत आरक्षण नाही  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 04:21 AM2017-08-21T04:21:27+5:302017-08-21T04:21:27+5:30

इयत्ता अकरावी प्रवेशासाठी घेतल्या जाणाºया ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या फेरीत आरक्षणाचा विचार केला जाणार नाही. रिक्त असलेल्या सर्व जागा सर्वांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उपलब्ध जागांवर प्रवेश मिळेल. दरम्यान, प्रवर्गनिहाय रिक्त जागा उपलब्ध करून न दिल्याने गोंधळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 There is no reservation in 'first priority' round | ‘प्रथम प्राधान्य’ फेरीत आरक्षण नाही  

‘प्रथम प्राधान्य’ फेरीत आरक्षण नाही  

Next

पुणे : इयत्ता अकरावी प्रवेशासाठी घेतल्या जाणाºया ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या फेरीत आरक्षणाचा विचार केला जाणार नाही. रिक्त असलेल्या सर्व जागा सर्वांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उपलब्ध जागांवर प्रवेश मिळेल. दरम्यान, प्रवर्गनिहाय रिक्त जागा उपलब्ध करून न दिल्याने गोंधळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आतापर्यंत प्रवेशाच्या पाच फेऱ्या पूर्ण झाल्या असून, सुमारे ७० हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी यंदा पहिल्यांदाच ‘प्रथम प्राधान्य’ ही फेरी राबवली जाणार आहे.
आतापर्यंतच्या सर्व फेऱ्यांमध्ये प्रवर्गनिहाय रिक्त जागा जाहीर केल्या जात होत्या. त्यानुसार पसंतीक्रम भरून प्रवेश निश्चित केला जात होता. मात्र या फेरीत रिक्त जागा जाहीर करताना प्रवर्गातील सर्व रिक्त जागा खुल्या गटात टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सर्व जागा उपलब्ध होणार आहेत. महाविद्यालयाची निवड करताना खुल्या किंवा कोट्यातील जागांवर प्रवेश घेता येईल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध जागा मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
जे विद्यार्थी संगणकावर आधी ‘अ‍ॅप्लाय नाऊ’ या बटनवर क्लिक करतील त्यांचाच प्रवेश निश्चित होणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याच्या संगणकात काही तांत्रिक दोष निर्माण झाल्यास, त्या भागात वीज
नसल्यास, इंटरनेट धीम्या गतीने असेल तर त्यांना या प्रक्रियेत पसंतीच्या जागेपासून मुकावे लागणार आहे. त्यांना चांगले गुण असूनही संबंधित महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही, असे दिसते.

आजपासून गटनिहाय फेºया सुरू
पहिली फेरी : ८० ते १०० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची असणार आहे.
वेळ : सकाळी १० ते ५
विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेश निश्चित करण्याची संधी मिळणार आहे.

केंद्रीय प्रवेश समितीकडून रविवारी ‘प्रथम प्राधान्य’ फेरीसाठी रिक्त जागांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. मात्र, ही यादी प्रसिद्ध करताना त्यामध्ये एससी, एसटी असे कोणतेही प्रवर्ग ठेवलेले नाहीत. सर्व प्रवर्गातील रिक्त जागा एकत्रित करून त्या खुल्या गटात टाकण्यात आल्या आहेत.

पहिल्या चार फेऱ्या आरक्षणनिहाय घेण्यात आल्या आहेत. ‘प्रथम प्राधान्य’ या फेरीत सर्वांना समान संधी दिली जाणार आहे. विद्यार्थी संख्या खूप कमी असल्याने प्रवर्गनिहाय प्रवेश होणार नाही. या फेरीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवर्गानुसार सर्व शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्तीचे लाभ मिळतील. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही.
- दिनकर टेमकर, विभागीय शिक्षण उपसंचालक

22363
रिक्त जागांची संख्या

3184
व्यवस्थापन व इनहाऊस कोट्यातील रिक्त जागा

25547
जागा या फेरीसाठी उपलब्ध होणार

Web Title:  There is no reservation in 'first priority' round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.