तरडे गावातील वस्तीवर जाण्यास नाही रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:09 AM2021-04-04T04:09:39+5:302021-04-04T04:09:39+5:30
सदरील बाब सरपंच मारुती बरकडे यांनी फॉरेस्ट विभागातील अधिकारी वर्गाच्या समोर आणली. त्यावेळी फॉरेस्ट अधिकारी मगर मॅडम व म्हस्के ...
सदरील बाब सरपंच मारुती बरकडे यांनी फॉरेस्ट विभागातील अधिकारी वर्गाच्या समोर आणली. त्यावेळी फॉरेस्ट अधिकारी मगर मॅडम व म्हस्के उपस्थित होते त्यांनी हा विषय वरिष्ठांच्या अखत्यारीतील असून त्यांच्याशी पत्रव्यवहार करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी अजय गाढवे, विठ्ठल गाढवे व ग्रामपंचायत सदस्य गुजाबा गाढवे उपस्थित होते.आजही गावामध्ये अशा वस्त्या आहेत की जिथे जाण्यासाठी रस्ताच नसल्याचे निदर्शनास येत असून ही अतिशय खेदजनक बाब आहे. शासनाच्या विविध योजना आज गावासाठी मंजूर होत असताना जर यासाठी जमीनच नसेल तर हा मंजूर झालेला निधी पुन्हा माघारी जात आहे त्यामुळे गावाचा विकास करायचा नेमका कसा करायचा हा प्रश्न निर्माण होत आहे.
फक्त तरडेच नाही तर परिसरातील सर्व गावांच्या गायरान जमिनी या वनविभागात वर्ग केल्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. या परिसरातील सर्व गावे डोंगरपरिसरात विखुरलेली असल्याने पूर्वीच्या डोंगर परिसरातून नैसर्गिकरित्या तयार झालेले रस्तेदेखील वनविभागात गेल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. अनेक गावांना तर गायरान काहीच शिल्लक राहिलेले नसून प्रशासनाने वनविभागाकडे वर्ग केलेल्या जमिनीबाबत लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.