पदामुळे निवडणूकीतून बाद असा नियम भाजपात नाही : माधुरी मिसाळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 11:48 AM2019-08-21T11:48:00+5:302019-08-21T11:49:17+5:30

मोठे पद आले म्हणून निवडणूक लढवता येणार नाही असा कोणताही नियम नाही..

There is no rule of out from election because of any post in the BJP : Madhuri Misal | पदामुळे निवडणूकीतून बाद असा नियम भाजपात नाही : माधुरी मिसाळ 

पदामुळे निवडणूकीतून बाद असा नियम भाजपात नाही : माधुरी मिसाळ 

Next
ठळक मुद्देआमदार माधुरी मिसाळ यांनी पर्वतीमधून दावेदार असल्याचेही केले स्पष्ट : गणेश बीडकरही इच्छुक

पुणे: भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहराच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून आमदार माधुरी मिसाळ यांनी मंगळवारी सकाळी पक्ष कार्यालयात कार्यभार स्विकारला. मावळते अध्यक्ष योगेश गोगावले यांच्याकडून त्यांनी सुत्रे स्विकारली. पद असले की निवडणूक लढवता येणार नाही असा पक्षात नियम नसल्याचे सांगत त्यांनी आपण पर्वतीमधून दावेदार असल्याचेही स्पष्ट केले.
शहर सरचिटणीस म्हणून गणेश बीडकर यांनीही सुत्रे स्विकारला. त्यांनीही आपण कसबा विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी देण्याची पक्षाकडे मागणी करणार असल्याचे सांगितले. महापौर मुक्ता टिळक, आमदार भीमराव तापकीर, जगदीश मुळीक, प्रदेश चिटणीस धीरज घाटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरली मोहोळ, दीपक मिसाळ, गणेश घोष यावेळी उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने शहराची जबाबदारी दिली आहे. विधानसभेच्या शहरातील सर्व जागा सध्या पक्षाकडे आहेत. त्या तशाच राहतील व पूर्वीपेक्षा जास्त मताधिक्य मिळेल या पद्धतीने काम करू असे मिसाळ यांनी सांगितले. मोठे पद आले, मग आता विधानसभा लढवणार का या प्रश्नावर त्यांनी पद आहे म्हणून निवडणूक लढवता येणार नाही असा कोणताही नियम पक्षात नसल्याचे सांगितले. 
युतीचा निर्णय सर्वस्वी पक्षश्रेष्ठींचा आहे. त्यामुळे याबाबतीत काहीच बोलणार नाही. पक्षाने आदेश दिल्यावर त्याप्रमाणे काम करणार. त्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळेल, पक्षाची शहरातील ताकद वाढवण्यासाठी सर्वस्वी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. गणेश बीडकर यांनीही गेली २५ पेक्षा जास्त वर्षे शहरात व त्यातही कसब्यात काम करत असल्याचे सांगत विधानसभेसाठी पक्षाकडे तिथूनच मागणी करणार असल्याचे सांगितले.
गोगावले म्हणाले, शहराध्यक्ष म्हणून साडेतीन वर्षे काम करता आले. नेतृत्वाने दिलेले सर्व आदेश चोखपणे पार पाडले. सहकाºयांची त्यासाठी फार मदत झाली. त्यांच्याशिवाय काम करता आले नसते. पक्षाचे सक्षम असे संघटन शहरात उभे करता आले, त्याची ताकद काय आहे ते महापालिका, लोकसभा निवडणूकीत दिसून आले. आता प्रदेश स्तरावरही चांगले काम करू असे ते म्हणाले. 

Web Title: There is no rule of out from election because of any post in the BJP : Madhuri Misal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.