तालुक्यातील एकाही रुग्णआंचे उपचाराअभाव हाल नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:11 AM2021-04-04T04:11:30+5:302021-04-04T04:11:30+5:30
--- राजगुरूनगर : खेड तालुक्यातील वाढत्या करोना रुग्णांवर वेळेत उपचारासाठी बेड उपलब्ध करण्याबाबत आमदार दिलीप मोहिते यांनी चांडोली ...
---
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील वाढत्या करोना रुग्णांवर वेळेत उपचारासाठी बेड उपलब्ध करण्याबाबत आमदार दिलीप मोहिते यांनी चांडोली ग्रामीण रुग्णालयात तालुका प्रशासनाची वैद्यकीय अधिकारी यांची आढावा बैठक घेऊन विविध सुचना केल्या. तालुक्यातील एकाही रुग्णांचा उपचाराअभावी हाल होऊ नये यासाठी सर्वांनी एकत्रित पणे समन्वयाने काम करताना आवश्यक मदत लागेल ती करण्यासाठी तातडीने संपर्क करण्याचे आदेश दिले.
सध्या उन्हाळा कडक असल्याने वीजेचे भारनियमन होण्याबरोबरच वीज कधीही जाऊ शकते त्यामुळे कोविडवर उपचार घेणाऱ्या रुग्णांचे हाल होऊ नये यासाठी सर्व ठिकाणी जनसेट बसविण्याबाबत सुचना करुन कंपन्याचा सीएसआर फंड आदीबाबत वापर करुन सुविधा त्वरीत उपलब्ध करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
ग्रामीण रुग्णालयात सौर उर्जेरील वॉटरहिटर आवश्यक असल्याचे निर्देशनास आणून दिले. त्यावर आमदार मोहिते म्हणाले की, आमदार फंडातून या योजनेला निधी वापरता येत असेल तर याबाबत चौकशी करुन लगेच निधी उपलब्ध करुन दिला जाईल. ग्रामीण रुग्णालयात नागरीकांना बसण्याची जागा असली तरी उन्हात बसण्याऐवजी झाडाखाली सिमेट बाकडे आणि पार्किंग शेड उभारण्यास लगेच कार्यवाही करु.
गेल्या कोविड काळात दहा लाखांचे चांडोली ग्रामीण रुग्णालयासाठी दोनशे आँक्सिमीटर आणि थर्मल गन आदी साहित्य दिलेअसून त्याचा वापर झाला नसेल तर सदर साहित्य कोठे आहे याची चौकशी करुन मला अहवाल देण्यात यावा अशी सुचना आमदार दिलिप मोहिते यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक भगवानराव काकणे यांना देऊन याबाबत नाराजी व्यक्त केली.
महसुल विभागामार्फत गोरगरीबांना धान्य किट वाटपासाठी वीस लाख निधी आला होता मात्र हा निधी वापरण्याऐवजी धान्य दुकानदारांकडून धान्य गोळा करुन किट वाटप केले याबाबत या निधीची प्रांत विक्रांत चव्हाण आणि तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी चौकशी करुन अहवाल देण्याची मागणी केली.
यावेळी प्रांत विक्रांत चव्हाण, तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी अजय जोशी, वैद्यकीय अधिक्षक डॉ. भगवानराव काकणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डाँ.बळीराम गाढवे, डाँ.शेंडंगे,अरुण चाभांरे आदीउपस्थित होते.