वाघोलीत केवळ विकासकामांना नाही जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:15 AM2021-02-27T04:15:03+5:302021-02-27T04:15:03+5:30
पीएमआरडीएच्या भूमिकेवर वाघोलीकरांचा आक्षेप ; वाघोली : वाघोली येथील ४ ॲॅमेनिटी स्पेसच्या जागा दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्यावर देण्याची सूचना पीएमआरडीएने ...
पीएमआरडीएच्या भूमिकेवर वाघोलीकरांचा आक्षेप ;
वाघोली : वाघोली येथील ४ ॲॅमेनिटी स्पेसच्या जागा दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्यावर देण्याची सूचना पीएमआरडीएने काढली असल्याने वाघोलीतील नागरिकांनी यावर तीव्र आक्षेप नोंदविला आहे. वाघोलीच्या कचरा प्रक्रिया प्रकल्प, सांडपाणी प्रकल्प, क्रीडांगण व इतर विकासकामांसाठी जागा नाही मात्र भाडेपट्ट्याने जागा देण्यासाठी लिलाव होत असल्याने पीएमआरडीएच्या भूमिकेवर आर्थिक तडजोडीची साशंकता निर्माण झाली आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) ने वाघोली मधल्या ४ ॲॅमेनिटी स्पेसच्या जागा भाडेतत्वाने देण्याचा निर्णय घेतला आहे. सोयी सुविधा न देता त्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या या जागांचा लिलाव नेमका कशासाठी असा परखड सवाल उपस्थित करत नागरिकांनी या निर्णयाला विरोध केला आहे.पीएमआरडीएच्या सूचनेनुसार पायाभूत सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी या जागा दीर्घ मुदतीच्या भाडेतत्वावर देण्यात येणार आहेत आणि त्यासाठी ई-लिलाव प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पण या परिसरात मुळातच सोयी-सुविधांचा अभाव आहे त्यामुळे हा लिलाव नेमका कशासाठी असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी या निर्णयाला आक्षेप घेतला आहे.
या विषयी बोलताना संजीव पाटील हे वाघोली चे रहिवासी म्हणाले , "पीएमआरडीए जागा भाडेतत्वावर देत ३० कोटी रुपये कमावण्याचा प्रयत्न करत आहे.पण मुळात साधारण वर्षाकाठी तीनशे ते चारशे कोटी रुपये उत्पन्न वेगवेगळ्या प्रकल्पाकडून मिळत असेल तर हा अट्टाहास कशासाठी आणि तो कोणाच्या फायद्यासाठी पीएमआरडीने हा मोठा निर्णय घेतला आहे असा प्रश्न वाघोलीकरच्या वतीने उपस्थित केला जात आहे.
वाघोलीत कचरा प्रकल्पांची, पिण्याच्या पाण्यासाठी सोय करण्याची आणि रस्ते बांधण्याची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. बिल्डरकडून यासाठी पीएमआरडीए ला जागा व निधी देखील देण्यात आलेला आहे.या जागावर दवाखाने तसेच क्रीडांगण याकारणांसाठी वापरले जानेे आवश्यक आहे.