"इतने छोटे फ्रॉड की जांच के लिए समयही नही मिलता; हमारे यहा यूपी मे तो बडे बडे कांड होते है! "
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2020 07:43 PM2020-11-07T19:43:59+5:302020-11-07T19:45:24+5:30
'गँगस्टर विकास दुबे एन्काउंटर'मधील पोलीस निरीक्षक शैलेंद्रसिंह यांच्याकडून पुणे पोलिसांच्या तपासाची 'तारीफ' !
पुणे : एटीएम फ्रॉड तो यहा छोटे छोटे पॉकेट है, हमारे यहा तो बडे बडे कांड होते है, इतने छोटे छोटे फ्रॉड की जांच के लिए समयही नही मिलता, असे कानपूरच्या गाजलेल्या 'गँगस्टर विकास दुबे एन्काउंटर'मधील पोलीस निरीक्षक शैलेंद्रसिंह यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले. एटीएम फ्रॉडमधील एका आरोपीला पकडण्यासाठी पुणे पोलीस कानपूरला गेले आहेत. शैलेंद्रसिंह यांच्या मदतीने पोलिसांनी त्याला पकडले.
याबाबत शैलेंद्रसिंह यांनी सांगितले की, ज्या पद्धतीने पुण्यात या आरोपींनी बँकेला गंडा घातला. तशीच मोडस वापरुन येथील तरुण सुरुवातीला आमच्याकडे फसवणुक करायचे. त्यावर आपण २००७ - ०८ मध्ये कारवाई केली होती. गेल्या वर्षी अशीच मोडस वापरणाऱ्यांवर आम्ही मोठ्या प्रमाणावर कारवाई केल्याने आता ते दुसऱ्या राज्यात जाऊन गुन्हे करीत आहेत.
इतक्या छोट्या प्रकरणात इतक्या दूर येऊन पुणे व महाराष्ट्र पोलीस कारवाई करीत असल्याचे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. त्याबाबत त्यांनी सांगितले की, अशा तपासासाठी इथे अन्य राज्यातून कोणी येत नाही़. पुणे पोलिसांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्या येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तपासात मदत करण्यास सांगितले. पुणे पोलीस सर्व तयारीनिशी आले होते. त्यांच्याकडील माहिती पाहून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले, अशा छोट्या फसवणूकीच्या गुन्ह्यांत तपासासाठी आम्हाला वेळही मिळत नाही.