"राज्यपालांना विधानपरिषदेच्या नियुक्त १२ आमदारांच्या पत्रावर स्वाक्षरीला वेळ नाही" राजू शेट्टी यांची कडवट शब्दात टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 01:13 PM2021-06-30T13:13:42+5:302021-06-30T13:14:30+5:30

१२ सदस्यांच्या यादीत शेट्टी यांचे नाव असल्याची चर्चा

"There is no time to sign the letter of 12 MLAs appointed by the Governor Legislative Council" Raju Shetty's harsh words | "राज्यपालांना विधानपरिषदेच्या नियुक्त १२ आमदारांच्या पत्रावर स्वाक्षरीला वेळ नाही" राजू शेट्टी यांची कडवट शब्दात टीका

"राज्यपालांना विधानपरिषदेच्या नियुक्त १२ आमदारांच्या पत्रावर स्वाक्षरीला वेळ नाही" राजू शेट्टी यांची कडवट शब्दात टीका

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यात भाजपचे सगळे नेते कासावीस त्यांनी कोणालाही शहाणपणा शिकवू नये

पुणे: राज्यपाल महोदय कामात असतात, त्यामुळे त्यांना विधानपरिषदेच्या नियुक्त १२ आमदारांच्या पत्रावर स्वाक्षरी करायला वेळ नसेल अशा कडवट शब्दात शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्य सरकारने विधानपरिषदेवर नियुक्त करायच्या १२ ,सदस्यांची यादी दिली त्यात शेट्टी यांचे नाव असल्याची चर्चा आहे. मात्र अनेक महिने झाले तरी राज्यपाल त्यावर स्वाक्षरी करायला तयार नाहीत. याविषयी विचारले असता शेट्टी यांनी राज्यपाल कामात आहेत, त्यामुळे त्यांना वेळ नाही असे सांगितले.

साखर आयुक्तांबरोबर भेट झाल्यावर पत्रकारांबरोबर बोलताना शेट्टी यांनी भाजपावरही टीका केली. ज्यांनी जात काढली त्यांच्याबरोबर शेट्टी जातात या भाजपाच्या टिकेला प्रत्यूत्तर देताना ते म्हणाले, 'सत्ता नसल्याने भाजपाचे सगळे नेते कासाविस झाले आहेत. त्यांनी कोणाकोणाची जात काढली ते राज्याला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी मला शहाणपणा शिकवू नये.'

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट साखर ऊत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर झाली. साखर कारखान्यांच्या आर्थिक अडचणींचा विचार केला जातो, पण त्यासाठी ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षातही घेतल्या जात नाहीत. याविषयी पवार यांच्याबरोबर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनाही भेटून मागणी केली आहे.

निती आयोगाने शेतकऱ्यांना ऊसाची किंमत तीन हप्त्यात द्यावी अशी शिफारस केली ती मान्य नाही. वेळ पडल्यास याविरोधात न्यायालयातही जाऊ. याविषयांसंदर्भात राजकीय पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा सुरू आहेत. यात राजकारणाचा काहीही संबध नाही. 

Web Title: "There is no time to sign the letter of 12 MLAs appointed by the Governor Legislative Council" Raju Shetty's harsh words

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.