डबे बदलून उपयोग नाही इंजिनच बिघडले आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:08 AM2021-07-10T04:08:37+5:302021-07-10T04:08:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केंद्र सरकारने मंत्री बदलले, पण डबे बदलून उपयोग नाही इंजिनच खराब झाले आहे, अशी ...

There is no use in changing the coaches. The engine is broken | डबे बदलून उपयोग नाही इंजिनच बिघडले आहे

डबे बदलून उपयोग नाही इंजिनच बिघडले आहे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : केंद्र सरकारने मंत्री बदलले, पण डबे बदलून उपयोग नाही इंजिनच खराब झाले आहे, अशी टीका केंद्रातील मंत्रिमंडळ बदलावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. आमची गाडीपण चांगली आहे व ड्रायव्हरपण चांगला आहे असे ते म्हणाले.

पुण्यात काँग्रेस भवनमध्ये पत्रकारांबरोबर बोलताना पटोले यांनी भाजपची संस्कृतीच खोटे बोलण्याची आहे, असे सांगितले. मोदी सत्तेवर आले ते खोटे बोलूनच. राज्य करतानाही खोटेच बोलत आहेत. परवा विधानसभेत विरोधी पक्षनेते खोटे बोलले. एकीकडे शिव्यांसाठी माफी मागतात दुसरीकडे शिव्या दिल्याच नाही म्हणतात. त्यांचे सगळे हेच सुरू आहे असे पटोले म्हणाले.

काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा मुद्दा नाहीच, अंतर्गत लोकशाही आहे. आता सर्वांना राहुल गांधी बरोबर वाटतात. नोटाबंदी, जीएसटी, कोरोना यावर त्यांनी मांडलेले मुद्दे बरोबर असल्याचे देशाला पटू लागले आहे. देशात बदल होणार याचेच हे चिन्ह असल्याचा दावा पटोले यांनी केला.

सहकार मंत्रालय काढले आहे केंद्र सरकारने. त्यांचा हेतू काही आत्ता सांगता येणार नाही. पण राज्यातील साखर कारखान्यांच्या चौकशीत चंद्रकांत पाटलांनी नितीन गडकरींच्या कारखान्यांची नावे टाकली हे मात्र वेगळे आहे.

र्इडी, सीबीआयसारख्या देशातील महत्त्वाच्या संस्थांना मोदी यांनी चिल्लर करून टाकले आहे. ते काय करतील सांगता येत नाही. त्यामुळेच भाजप सोडला. तिथे स्वायतत्ता नाही. राज्यातही तिथे गेलेले अनेकजण लवकरच परतताना दिसतील, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.

सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार शरद रणपिसे, माजी आमदार उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, दीप्ती चवधरी आदी उपस्थित होते.

Web Title: There is no use in changing the coaches. The engine is broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.