महापालिका केंद्रांवर आज लस नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:10 AM2021-07-01T04:10:14+5:302021-07-01T04:10:14+5:30
पुणे : राज्य शासनाकडून कोविशिल्ड लसीचा पुरवठा न झाल्याने, आज (गुरुवार, १ जुलै) शहरातील महापालिकेची सर्व लसीकरण केंद्रे लसीअभावी ...
पुणे : राज्य शासनाकडून कोविशिल्ड लसीचा पुरवठा न झाल्याने, आज (गुरुवार, १ जुलै) शहरातील महापालिकेची सर्व लसीकरण केंद्रे लसीअभावी बंद राहणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शहरात लसीकरणाने मोठा वेग घेतला होता. इतर शहरांच्या तुलनेने पुणे शहराला मोठ्या प्रमाणावर लस पुरवठा होत होता. मात्र, बुधवारी राज्य शासनाकडून लस प्राप्त न झाल्याने, आज महापालिकेच्या केंद्रांवर होणारे लसीकरण पूर्ण बंद राहणार आहे. दरम्यान, कमला नेहरू रुग्णालयात परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना महापालिकेकडील शिल्लक कोविशिल्ड लस उपलब्ध करून दिली जाणार आहे.
------
कोव्हॅक्सिन सहा केंद्रांवर उपलब्ध
शहरातील प्रत्येक झोननिहाय एका रुग्णालयात व ससून रुग्णालयात आज कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस मात्र उपलब्ध राहणार आहे. ज्यांनी २ जूनपूर्वी पहिला डोस घेतला आहे अशांना ५० टक्के लस ऑनलाईन बुकिंगव्दारे तर ५० टक्के लस ही ऑन दी स्पॉट उपलब्ध असेल. येथील लसीकरणासाठी बुकिंग करण्याकरिता सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे.