जीएसटीबाबत पुरेशी तयारी नाही

By admin | Published: June 27, 2017 07:51 AM2017-06-27T07:51:34+5:302017-06-27T07:51:34+5:30

जुलै महिन्यापासून संपूर्ण देशात वस्तू व सेवा कर प्रणाली लागू होणार आहे. यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या करप्रणालीत बदल होणार आहेत.

There is not enough preparation for GST | जीएसटीबाबत पुरेशी तयारी नाही

जीएसटीबाबत पुरेशी तयारी नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धनकवडी : जुलै महिन्यापासून संपूर्ण देशात वस्तू व सेवा कर प्रणाली लागू होणार आहे. यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या करप्रणालीत बदल होणार आहेत. सर्व करांच्या बदल्यात जीएसटी अशी करप्रणाली सरकार सांगत आहे. मात्र पुरेशी तयारी न करता जुलैपासून जीएसटी लागू होणार असल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होणार असल्याचे चार्टर्ड अकाउंटट व्ही. जी. शहा यांनी सांगितले.
धनकवडी व्यापारी संघटना व पुणे जिल्हा व्यापारी महामंडळाच्या वतीने वस्तू व सेवा कर प्रणाली याविषयी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी व्यापारी संघटनेचे महेंद्र पितळीया, आमदार भीमराव तापकीर, माजी महापौैर दत्तात्रय धनकवडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे, नगरसेवक बाळासाहेब धनकवडे, युवराज बेलदरे, प्रभाग समिती अध्यक्षा अश्विनी भागवत, नगरसेविका वर्षा तापकीर, उद्योजक गणेश भिंताडे, चार्टर्ड अकाउंटंट मिलिंद भोंडे, केरोसिन वितरण संघटनेचे अध्यक्ष काकासाहेब देशमुख, धनकवडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महेश खोपडे, उपाध्यक्ष राजू डागी,
कामिनी फूड्सचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात व्यापारी संघटनेच्या वतीने स्नेहमेळावा, आदर्श व्यापारी पुरस्कार वितरण तसेच दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते.

Web Title: There is not enough preparation for GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.