शिक्षणसंस्थेतून सुरवंटाचे फुलपाखरू व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:21 AM2021-02-21T04:21:43+5:302021-02-21T04:21:43+5:30

मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालयाच्या (एम एमसीसी) वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रभुणे बोलत होते. या वेळी पिंपरी चिंचवडचे पोलीस ...

There should be a caterpillar butterfly from the academy | शिक्षणसंस्थेतून सुरवंटाचे फुलपाखरू व्हावे

शिक्षणसंस्थेतून सुरवंटाचे फुलपाखरू व्हावे

Next

मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालयाच्या (एम एमसीसी) वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रभुणे बोलत होते. या वेळी पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, मराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार आदी उपस्थित होते.

मंचक इप्पर म्हणाले, सजीव त्यांच्या संभाव्य क्षमतेपर्यंत विकसित होऊ शकतात. पण मनुष्य आपल्या संभाव्य क्षमतेपर्यंत पोहोचत नाही. यामुळे सर्वांनी योग्य वेळेला योग्य निर्णय घेतला पाहिजे.

दरम्यान, मराठवाडा महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी उदय आव्हाड याने यूपीएससी परीक्षेत देशात ११ वा क्रमांक पटकवल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. तसेच कनिष्ठ विभागातील प्रांजली नागुरकर आणि वरिष्ठ विभागातील श्रुती मडनल यांना ‘डॉ. प्र. चिं. शेजवलकर स्मृती शैक्षणिक गुणवत्ता पारितोषिक’ प्रदान करण्यात आला. तसेच यावेळी खेलो इंडिया युथ गेममध्ये जलतरण विभागात सुवर्णपदक जिंकलेल्या साध्वी धुरी हिचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. एम. आर. गायकवाड यांनी केले. तर डॉ. सुजाता शेणई यांनी सूत्रसंचालन आणि स्वाती बर्वे यांनी आभार मानले.

Web Title: There should be a caterpillar butterfly from the academy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.