माजी विद्यार्थ्यांच्या कृतज्ञता भावातून प्रत्येक विद्यालयात विधायक कार्य व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:14 AM2021-08-18T04:14:58+5:302021-08-18T04:14:58+5:30
वाघीरे विद्यालय सासवड येथे 1988 च्या बॅचचे माजी विद्यार्थी गेली पाच वर्षे कृतज्ञता निधी गोळा करून शालांत परीक्षेतील गुणवंत ...
वाघीरे विद्यालय सासवड येथे 1988 च्या बॅचचे माजी विद्यार्थी गेली पाच वर्षे कृतज्ञता निधी गोळा करून शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित करतात. यावर्षीदेखील शालांत परीक्षेतील प्रथम क्रमांकाचे गुणवंत विद्यार्थी समीक्षा चाबुकस्वार, यश बुद्धिवंत, प्रेरणा नवले, कृष्णा जडगे यांना तसेच गणित विषयातील स्व. गोळेसर पारितोषिक प्राची हिवरकर, आर्या काळभोर, सई जगदाळे, प्रणाली कापरे यांना प्रदान करण्यात आले.
तसेच आयुष गवळी, यशराज बोरकर, ऋतुराज जगताप, वैष्णव जगताप, सोहम बोरकर,ओम बोत्रे, प्रणव घंटे या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मनोगत व्यक्त करताना निवृत्त लष्करी अधिकारी भाग्यवान म्हस्के यांनी विद्यार्थ्यांनी एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित करायला हवे असे सांगून सैन्यभरतीतील संधींविषयी मार्गदर्शन केले. विद्यालयाचे माजी शिक्षक मधुकर हेंद्रे, श्रीकांत देशपांडे आणि स्नेहल देशपांडे, सुधाकर जगदाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माधुरी विधाटे यांनी सूत्रसंचालन केले. शैलेश घंटे यांनी आभार मानले.
सासवड येथील वाघिरे विद्यालयात माजी विद्यार्थ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला