प्रधान मास्तरांचे पुण्यात स्मारक व्हायला हवे : डॉ. शां. ब. मुजुमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:14 AM2021-08-27T04:14:05+5:302021-08-27T04:14:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, या विद्यानगरीत तत्त्वनिष्ठ आणि हाडाचे शिक्षक असलेल्या ...

There should be a memorial of Pradhan Master in Pune: Dr. Sh. B. Muzumdar | प्रधान मास्तरांचे पुण्यात स्मारक व्हायला हवे : डॉ. शां. ब. मुजुमदार

प्रधान मास्तरांचे पुण्यात स्मारक व्हायला हवे : डॉ. शां. ब. मुजुमदार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, या विद्यानगरीत तत्त्वनिष्ठ आणि हाडाचे शिक्षक असलेल्या प्रधान मास्तरांचे स्मारक व्हावे. ते पुढच्या पिढ्यातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरक ठरेल, अशी अपेक्षा सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी व्यक्त केली.

समाजशिक्षक, साक्षेपी लेखक आणि विचारवंत प्रा. ग. प्र. प्रधान यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, साधना साप्ताहिक, साहित्य शिवार दिवाळी अंक आणि अक्षरधारा बुक गॅलरी यांच्या वतीने 'प्रा. ग. प्र. प्रधान यांची विचारसृष्टी आणि समकालीन राजकारण' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले, एस. के. कुलकर्णी त्यात सहभागी झाले होते. मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, साहित्य शिवार दिवाळी अंकाचे संपादक जयराम देसाई, अक्षरधारा बुक गॅलरीच्या संचालिका रसिका राठिवडेकर उपस्थित होते. प्रा. ग. प्र. प्रधान यांच्या 'स्वातंत्र्य संग्रामाचे महाभारत' आणि 'माझी वाटचाल' या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

शिरसाठ म्हणाले, प्रधान सरांनी स्वत:च्या मयार्दांविषयी स्वत:च प्रांजळपणे लिहून ठेवले त्यामुळे त्यांच्यावर कधीही टीका झाली नाही. त्यांचे अप्रकाशित साहित्य या वर्षात साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित केले जाईल.

गोखले म्हणाले, 'प्रधान सरांची भाषणे आजच्या लोक प्रतिनिधींनी अभ्यासली पाहिजेत. त्यांची विचारसृष्टी चौफेर वाचनातून घडली होती.

जोशी म्हणाले, 'आजच्या राजकारणामुळे कलुषित झालेल्या समाज जीवनात प्रधान सरांचे जीवन दीपस्तंभाप्रमाणे आहे. ज्या महाराष्ट्राला महात्मा गांधींनी कार्यकर्त्यांचे मोहोळ म्हटले होते. त्या महाराष्ट्रात आज कुठे गेले कार्यकर्ते असा प्रश्न विचारावा लागतो ही शोकांतिका आहे.

जयराम देसाई यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले. रसिका राठीवडेकर यांनी आभार मानले.

Web Title: There should be a memorial of Pradhan Master in Pune: Dr. Sh. B. Muzumdar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.